वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे ५ जुलै पासून होणाऱ्या श्रामणेर प्रक्षिशण शिबीरात सहभागी व्हावे -महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 19, 2020

वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे ५ जुलै पासून होणाऱ्या श्रामणेर प्रक्षिशण शिबीरात सहभागी व्हावे -महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांचे आवाहन


दाभड-नांदेड (प्रा.विकास कदम ) : महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे येत्या आषाढी पौर्णिमा, दि. ५ जुलै   ते आश्विन पौर्णिमा दि. १ ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या श्रामणेर शिबिरात उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार बावरीनगर चे मुख्य प्रवर्तक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

              बौद्ध धम्मामध्ये आषाढी पौर्णिमेस खुप महत्वाचे स्थान आहे. याच पौर्णिमेस पाच महत्वाच्या घटना घडल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. त्या म्हणजे महामाया महामातेस पड्लेले स्वप्न अर्थात गर्भधारणा, सिद्धार्थ गौतमाने केलेला गृहत्याग, पाच परिव्राजकांना धम्माचा प्रथम उपदेश, भिक्खु दिक्षा आणि श्रद्धेय भिक्खुंचा वर्षावास प्रारंभ होय, असे तीर्थक्षेत्र महाविहर बावरीनगर दाभड च्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

                आषाढ पौर्णिमा ते आश्विन
पौर्णिमा या वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना धम्माचा प्रचार - प्रसार करताना पावसाचा तथा तत्सम अडचणींचा त्रास होऊ नये म्हणून तथागत भगवान बुद्धांनी या  कालावधीत वर्षावासा संबंधीचे विनय भिक्खुंना सांगितले. त्यानुसार, भिक्खूंनी वर्षा ऋतुमध्ये एकाच ठिकाणी (विहारात) निवास करावा, असा नियम सांगितला. या काळात उपासक -उपासिका बुद्ध विहारात जाऊन धम्म ग्रहण करीत असतात.
                याच हेतुने सदर तीन महिन्याच्या कालावधीत महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रक्षिशण देण्यात येणार आहे. या कालावधित बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभिर्यपूर्वक ज्ञान मिळवण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रद्धेय भिक्खू धम्मसेवक महाथेरो, श्रद्धेय भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व श्रद्धेय भिक्खू संघाची  उपस्थिती लाभणार आहे. 
वय वर्षे 12 ते 30 दरम्यान असलेल्या उपासकांनी मोठ्या संख्येने श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होऊन धम्मदानाने लाभान्वित व्हावे.
श्रामणेर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उपासकांची covid-19 कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती शिबिराच्या संयोजकांकडून देण्यात आलेली आहे.
              श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होण्यासाठी दि. २ जुलै   पर्यंत भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (8600844888), भिक्खू पय्यारत्न थेरो (9823573551), भिक्खू संघपाल (9673361358), भिक्खू शीलरत्न (9960955463), इंजि. यशवंत गच्चे (8551078379), डॉ. मिलिंद भालेराव (8275344904) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News