तृप्ती फोले हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत यश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 20, 2020

तृप्ती फोले हिचे नवोदय प्रवेश परीक्षेत यश



किनवट( भोजराज देशमुख ) : किनवट तालुक्यातील शिवणी पासून जवळच असलेल्या सोनवाडी येथील विध्यार्थीनी तृप्ती दत्ता  फोले हिची जवाहर नवोदय विद्यालय वसमत जि. हिंगोली येथे वर्ग  सहावीत प्रवेशासाठी निवड झाली आहे. 
         नवोदय विद्यालय समिती मार्फत देशातील नवोदय विद्यालया मधील सहावीत प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते या वर्षी ही परीक्षा ११जानेवारी २०२० रोजी घेण्यात आली होती कोरोना १९  वाढत्या संसर्गामुळे या परीक्षेचा निकाल लाबवलां होता तो निकाल १९ जुन २०२० रोजी घोषित करण्यात आला या निकालात सोनवाडी या छोट्याशा आदिवासी गावातील तृप्ती दत्ता फोले हिची वसमत येथील नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड झाली आहे. आपल्या ह्या यशाचे श्रेय आजी आजोबा, आई,वडील, आत्या, मामा,  काका, काकु, व तिच्या शाळेतील शिक्षकांना दिले आहे.
या यशा बद्दल किनवट पं .स.चे उपसभापती कपिल करेवाड, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे, संजय कराड, कृ. ऊ. बाजार समिती ईस्लापुरचे उपसभापती बालाजी आलेवार, डॉ. माधव फोले, पत्रकार भोजराज देशमुख, प्रकाश कार्लेवाड, जी.जी. तरटे, डॉ. कविता फोले यांनी कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News