किनवट : मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत गट साधन केंद्र, किनवटच्या वतीने तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना १,८५,८२१ पाठ्यपुस्तकांचे संच मोफतवाटप होणार आहेत. आजपर्यंत २० केंद्रांतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुस्तके हस्तगत केली असून तालुक्यातील ९० टक्के शाळांपर्यंत पुस्तके पोहचली आहेत, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून रविवारी सात जून रोजी इयता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली होती. समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरणास शैक्षणिक वर्षाच्या शाळारंभाच्या आधीपासूनच जिल्हा परिषद ( मुलांचे ) हायस्कूल, किनवट येथे प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचे हस्ते धानोरा (बे ) शाळेचे मुख्याध्यापक माधव भिसे, आनंदवाडीचे श्रीहरी मुंडे यांना पुस्तकाचे वितरण केले. यावेळी उत्तम कानिंदे, विषय तज्ज्ञ बाबूराव इब्बीतदार, दत्तात्रय मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मोफत पाठ्यपुस्तक योजने अंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यावर्षी इयत्ता- पहिली ते आठवीच्या सर्व विषयांची मराठी; उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे वर्गनिहाय संच खालील संख्येनुसार वितरित केले जाणार आहेत :
वर्ग- पहिला -१६९८८ , दुसरा-१६९८८ , तिसरा- २१४४०, चौथा- १९५५९, पाचवा- २४९८६, सहावा- २९३३९,सातवा-२९३०९ ,आठवा-२७२१२ याप्रमाणे एकूण संच १८५८२१
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर ठेऊन व मास्क वापरूनच वाटप होत आहे. मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी विभाग प्रमुख दत्तात्रय मुंडे, एस.एन. ब्राह्मण यांचेसह सर्व विषयतज्ज्ञ व विषय शिक्षक आदी परिश्रम घेत आहेत.
जाहिरात
Translate
Live
Followers
Saturday, June 20, 2020
Home
किनवट तालुका
नांदेड जिल्हा
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यात १,८५,८२१ पाठ्यपुस्तकांचे संच वाटप होणार
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यात १,८५,८२१ पाठ्यपुस्तकांचे संच वाटप होणार
Tags
# किनवट तालुका
# नांदेड जिल्हा
Share This
About NIVEDAK NEWS
नांदेड जिल्हा
Tags
किनवट तालुका,
नांदेड जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड, ता. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुव...
-
माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) द...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
-
AI Image नांदेड, ता. 12 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 व 15 मे 2026 हे दोन दि...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment