कोरोनातून 23 व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी ; ननीन चार व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 21, 2020

कोरोनातून 23 व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी ; ननीन चार व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

 
नांदेड : डॉ. पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 15 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथील 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने जिल्ह्यातील एकुण 23 बाधितांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 209  व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आज सायं 5 वाजेपर्यंत नांदेड शहरातील राजनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष, रहेमतनगर येथील 48 वर्षाचा एक पुरुष आणि भगतसिंग रोड नांदेड येथील 55 वर्षाची एक महिला आहे. याचबरोबर 62 वर्षाचा पिरबुऱ्हानगर येथील एका पुरुष रुग्णाचा 19 जून रोजी मृत्यू झाला आहे. मृत्यूपश्चात सदर रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 77 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.आजच्या 4 बाधित व्यक्तींमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 301 एवढी झाली आहे. पुणे येथून 2 कोरोना बाधित रुग्ण वय 12 व 16 वर्षे तसेच मंडई नांदेड येथील रहिवासी असलेली 45 वर्षाची माहिला हैद्राबाद येथून संदर्भीत करण्यात आली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्याची एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 304 एवढी झाली आहे. आतापर्यंत 304 बाधितांपैकी 209 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 81 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.
 नांदेड जिल्ह्यात 81 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 20 जून रोजी 45 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 825,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 639,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 950,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 04,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 209,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 81,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 45 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 20/06/2020 वेळ 05.00 PM


आत्तापर्यंत एकूण संशयित - 5637
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 5305
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2905
अजून निरीक्षणाखाली असलेले - 109
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 23
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 5282
•   आज घेतलेले नमुने - 35
एकुण नमुने तपासणी- 5639
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 301
पैकी निगेटीव्ह - 4950
नमुने तपासणी अहवाल बाकी- 45
नाकारण्यात आलेले नमुने - 91
अनिर्णित अहवाल – 243
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 209
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 14
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145825 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News