भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला 'नायब तहसीलदार' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 22, 2020

भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला 'नायब तहसीलदार'





तिवसा ( अमरावती ) : " रांगोळी....है क्या भंगार... लोहा...लोखंड... रद्दी भारोभार... ! " असे जोरजोराने ओरडून
भंगारगोळा करणाऱ्या बाबूराव गडलिंग यांचा मुलगा अक्षयने मोठ्या जिद्दीने नायब तहसिलदारपद मिळवून " कबाड से भी हिरा चमकता है " हेच दाखवून दिलं आहे. या भरीव यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

               अमरावती  जिल्ह्यातील तिवसा येथील हातावर पोट असणाऱ्या एका लहानशा कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र राज्यसेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अक्षय बाबूराव गडलिंग असे या तरुणाचे नाव आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात आणि त्याबदलात रांगोळी विकण्याचा व्यवसाय करतात. वडीलांची मुलाला अधिकारी बनविण्याची धडपड आणि मेहनत डोळ्यासमोर ठेऊन अक्षयने त्याच्या जिद्दीची वात तेवत ठेवली. अक्षय आता नायब तहसिलदार झाला आहे. कुटुंबाच्या गरीब परिस्थितीच्या खडतर मार्गातून मेहनतीच्या जोरावर त्याने यश गाठले आहे.

                अक्षय गडलिंग हा तिवसा शहरात राहतो. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अक्षय महागडे शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. त्यामूळे त्याने विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्याने दिल्ली येथील शिकवणी वर्गात तसेच तिवस्यातील राजर्षी शाहू महाराज वाचनालयात तासनतास बसून अभ्यासाचे धडे गिरवले. गेल्यावेळी तहसीलदार पदासाठी तीन गुणांनी नापास झालेला अक्षय खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला आणि त्याने यश मिळविले.

मला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय आईवडिलांना, मित्रांना आणि शिक्षकांना देतो.  माझे बाबा हे इयत्ता नववी पास असून आई  चौथी पर्यंत शिकलेली आहे.घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील भंगार, रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करतात, तर आई मोलमजुरी करते. असे असूनही त्यांनी गरिबीची झळ मला कधीच पोहचू दिली नाही.
-अक्षय गडलिंग


सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले आशिष बोरकर हे तिवसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना ते राज्य सेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मुलांचे मोफत शिकवणी वर्ग घ्यायचे. याच दरम्यान त्यांची अक्षय गडलिंग याच्याशी भेट झाली. अक्षयची अभ्यासाविषयीची तळमळ बघून आशिष बोरकर यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याला अनेक महागडी पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदत केली. दरम्यान, अक्षयच्या या यशाबद्दल त्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News