बांगडीवाल्या आईची मुलगी शेख वसीमा महेबुब झाली उप जिल्हाधिकारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 22, 2020

बांगडीवाल्या आईची मुलगी शेख वसीमा महेबुब झाली उप जिल्हाधिकारी



नांदेड ( बालासाहेब लोणे ) : येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथील बांगड्या विकणाऱ्या आईची मुलगी शेख वसीमा महेबुब हिने एमपीएसपी परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून तिसरा क्रमांक पटकावून  उप जिल्हाधिकारी पद मिळविल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
               नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात जोशी सांगवी येथे शेख महेबूब राहतात. विटावर विटा अठरा थर रचून त्यावर आठ टिनपत्रे टाकून बनवलेलं घर. यातच सर्व कुटूंब नांदतं.  वसीमाचे वडील मनोरुग्ण. त्यामुळे घराचा संपूर्ण भार आईवरच. तिची आई डोक्यावर बांगड्यांचं ओझं घेऊन शेजारील गावोगावी,घरोघरी जाऊन बांगड्या विकायचं काम करते. यातूनच घरप्रपंच व वसीमाचं शिक्षण. सामाजिक बंधनं झुगारून मुलीचं लग्न न करता पदवीपर्यंतचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी तिच्या आईला अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला. येथूनच वसीमाचा संघर्ष सुरू झाला. मोठ्या जिद्दीने तिने शिक्षणाची कास धरली. गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिने प्राथमिक शिक्षण व खासगी शाळेत माध्यमिक शिक्षण घेतलं. कंधार येथे ११ व १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ये -जा करीत तिने  महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. त्यानंतर डी.एड्. व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. अथक परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाच्या जोरावर त्या २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची एसटीआय परीक्षा उत्तीर्ण होऊन सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून नागपूर येथे रूजू झाल्या. त्यानंतर या वर्षी महाराष्ट्रातून तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी उपजिल्हाधिकारी पद पटकावले. त्यांचे हे यश प्रत्येकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
                  सर्वच समाजासोबत प्रत्येक संघर्षशिल माणसाने शेख वसीमा मेहबूब        हिच्या संघर्षाची प्रेरणा घ्यावी. विशेषतः मुस्लीम समाजानेही मुलींच्या शिक्षणाकडे आता गांर्भियांने लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं. येथील गुरुजनांनी माझ्या शिक्षणाचा पाया पक्का केला त्यामुळेच मी हे यश गाठू शकले. मोलमजूरी करून बांगड्या विकून आईनं घेतलेली मेहनत, भावाने ऍटोरिक्षा चालवून केलेले परिश्रम या यशामागे आहेत. कोणत्याही पदावर गेले तरी या मातीला,गावाला मी विसरणार नाही.
-शेख वसीमा महेबूब

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News