किनवट : फक्त खाणं व राहाणं याच गर्तेत असणाऱ्या शासकीय आश्रम शाळांमध्ये आधुनिक योजना, सुविधा व उपक्रम राबवून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांनी शासकीय आश्रम शाळांचा चेहरा -मोहरा बदलवून नामांकित पब्लीक स्कूलसारखा मॉडर्न लूक दिला आहे.
ता. आठ ऑक्टोबर २०१८ रोजी अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांनी किनवटचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून किनवट प्रकल्पामध्ये असलेल्या सर्व शासकिय आश्रमशाळांचा चेहरा-मोहरा बदलायचा चंग बांधला.
सिकलसेल तपासणी अभियान
सर्व प्रथम विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन प्रकल्पातील १६ शासकिय आश्रमशाळा व ०१ एकलव्य रेसिडेंसिएल स्कुलमध्ये ता. ७
ऑगष्ट २०१९ ते १२ सप्टेंबर २०१९ या
कालावधीत सिकलसेल तपासणी अभियान राबविण्यात आले. या तपासणीमध्ये
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक,
तालुका आरोग्य अधिकारी, आश्रमशाळा
फिरते वैद्यकिय पथक केंद्र बोधडी व
सारखणी, तसेच अटल आरोग्य वाहिनी पथक केंद्र उमरी (बाजार), बोधडी व दुधड या यंत्रणांनी सहभाग नोंदवुन एकुण ५३३३ विद्यार्थांची तपासणी करण्यात आली. त्या
पैकी १८२ विद्यार्थ्यांची नोंद सकारात्मक
झाली आहे. या साठी कार्यालयाकडुन १६
आश्रम शाळांना १५० सिकलसेल टेस्ट किटचा पुरवठा करण्यात आला आहे.
प्रेरिका प्रशिक्षण
ता. सहा जून ते १० जून २०१९ प्रकल्पातील स्त्री शिक्षण विस्तार अधिकारी, शासकिय आश्रमशाळेतील स्त्री अधिक्षिका व वसतीगृहांच्या महिला गृहपाल अशा एकुण २५ महिला कर्मचाऱ्यांना प्रेरिका प्रशिक्षण देण्यात आले. त्यात : स्वच्छता व आरोग्य, आहार, मुलींचे आरोग्य व्यवस्थापन, स्पर्श जाणीव, स्वरक्षण आणि कायदा, व्यक्तीमत्व विकास व सुसंवाद, सोंदर्यवर्धन, योग साधना इत्यादी विषयाचा समावेश
करण्यात येऊन सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या राबविण्यात आले. या प्रेरिका मार्गदर्शन
करतात त्यामुळे विद्यार्थिंनींमध्ये जागरुकता व आत्मविश्वास निर्माण होतो.
सिकरुम
सर्व शासकिय आश्रमशाळेमध्ये
विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत सिक रुम मंजुर करुन घेऊन त्यांचे बांधकाम दर्जेदार
व्हावे यासाठी स्वत: व सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) तसेच कनिष्ठ विस्तार अधिकारी यांना वेळोवेळी बांधकामास भेटी देण्याचा सूचना देऊन सर्व शाळेतील सिकरुमचे बांधकाम दर्जेदार करुन घेण्यात आले. या सिक रुमचा वापर विद्यार्था आजारी असल्यास, त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी, तसेच फिरते वैद्यकिय पथक व अटल आरोग्य वाहिनिचे डॉक्टर यांना निवासासाठी करण्यात येतो.
भोजन शेड
सर्व शासकिय आश्रमशाळांमध्ये जिल्हा आदिवासी उपयोजने अंतर्गत भोजन शेड मंजुर झाले असुन बांधकाम पुर्णत्वाकडेआहे. या भोजनशेड मध्ये कायापालट योजनेअंतर्गत डायनिंग टेबलची व्यवस्था करण्यात आली . या पुर्वी जे विद्यार्थीउघड्यावर व जमिनीवर बसुन जेवण करायचे. जेवण करते वेळीपाऊस आला तर ताटासह जावे लागायचे हा त्रास आता पुर्णपणे दुर झाला असुन सर्व विद्यार्थी एकत्रित बसुन व्यवस्थितपणे जेवण घेतात.
व्यायाम शाळा
प्रकल्पाअंतर्गत सर्व शासकिय आश्रमशाळांमध्ये जिल्हा आदिवासी उपयोजना अंतर्गत व्यायाम शाळा मंजुर करुन घेण्यात आल्या असुन त्यांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. शासन निर्णया नुसार आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या असुन क्रीडा शिक्षकांचे मदतिने सर्व विद्यार्थी व्यायामशाळेत व्यायामाचे धडे घेतात . ज्या मुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले
राहण्यास व्यायाम शाळांचा चांगला उपयोग होत आहे.
स्वच्छता गृह
सर्व शासकिय आश्रमशाळांमध्ये विशेष केंद्रिस सहाय्य योजने अंतर्गत स्वच्छतागृह मंजुर करण्यात आले असुन त्यांचे जवळपास सर्व शाळांत
बांधकाम पुर्ण झाले आहे. एका स्वच्छता गृहात ०५ शौचालय, ०५ स्नानगृह, ०५ युरिन ल्स व०५ कपडे धुण्याकरीता ओटे यांचा समावेश आहे. या मुळे विद्यार्थ्यांचे ऊघडयावर शौचास जाणे थांबुन शाळाबाह्य परिसर स्वच्छ राहतो. तसेच कपडे धुण्यासाठी नदी, अथवा नाल्यावर जाणे बंद झाले आहे.
संगणक कक्ष
सर्व शासकिय आश्रमशाळांना विशेष केंद्रिय सहाय्य योजनेअंतर्गत १३५ संगणक व ९० संगणक टेबलचा पुरवठा करुन संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच शासननिर्णया नुसार सर्व १६ आश्रमशाळांवर संगणक शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगणक शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी संगणकात पारंगत होत आहेत.
डिप फ्रिजर
कार्यालयाच्या नाविण्यपुर्ण योजनेतुन १२ शासकिय आश्रमशाळांना डिप फ्रिजरचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्यात नाशवंत भाजीपाला, दुध, अंडी, इ.साठवणूक करता येते, ज्या मुळे भाजीपाला व दुध यांची उपयोगीता वाढते.
ध्वनीक्षेपक
कार्यालयाचे नाविण्यपुर्ण योजनेतुन १६ शासकिय आश्रमशाळांना प्रत्येक शाळेस ०२ या प्रमाणे ३२ ध्वनीक्षेपकाचा पुरवठा करण्यात आला. यांचा उपयोग वर्गातअध्यापणासाठी तसेच सांस्कृतीक कार्यक्रमासाठी करण्यात येतो.
प्रोजक्टर
कार्यालया अंतर्गत १६ आश्रमशाळांना प्रत्येक शाळेस ०२ या प्रमाणे नाविण्यपुर्ण योजनेतुन प्रोजेक्टर पुरविण्यात आले आहेत. यांचा विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षणासाठी फायदा होतो.
हॅन्डवॉश स्टेशन
सर्व शासकिय आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीला शासननियमा नुसार दिल्या जाणाऱ्या निधीमधुन हॅन्ड वॉश स्टेशन तयार करण्यात आले असुन विद्यार्थी नियमित भोजनपुर्वी व शौचानंतर हॅन्डवॉशक्लिनिकच्या सहाय्याने हात स्वच्छ करतात. ज्या मुळे विद्यार्थ्यांचा विषानु संसर्गापासुन बचाव होऊन आरोग्य चांगले राहते.
ग्रंथालय
कार्यालया कडुन नाविण्यपुर्ण योजनेतुन सर्व शाळांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तके व संदर्भ ग्रंथ पुरवठा करण्यात आला असुन, त्यासाठी लागणारे बुक केस पण कार्यालयाचे विशेष केंद्रिय सहाय्य योजनेतुन पुरविण्यात आले आहेत. सर्व मुख्याध्यापक यांचे नियंत्रणात ग्रंथाचे व पुस्तकांचे वर्गीकरण करुन सुसज्ज ग्रंथालय सर्व शाळेत तयार करण्यात आले आहेत.
क्रीडा साहित्य
सर्व शासकिय आश्रमशाळांना विशेष केंद्रिय सहाय्य योजने मधुन क्रीडा साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच नाविण्य पुर्ण योजनेतुन शासकिय आश्रमशाळा सारखणी,पाटोदा, बोधडी, जलधरा, सहस्त्रकुंड, ऊमरी (बा) व किनवट या शाळांना प्रत्येक शाळेचा १८० सिट या प्रमाणे कब्बडी मॅटचा पुरवठा
करण्यात आला आहे. ज्या मुळे या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस पटकावले आहेत.
रोटीमेकर मशिन
शासकिय कन्या आश्रमशाळा बोधडी व सारखणी येथे कार्यालयाचे नाविण्यपुर्ण योजनेतुन प्रत्येक शाळेस ०१ या प्रमाणे ०२ रोटी मेकर मशिन पुरविण्यात आल्या. या मुळे अतिरिक्त मनुष्य बळाची बचत होऊन वेळेत चपाती तयार होते.
जलशुध्दीकरण यंत्र
किनवट तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे बरेचसे स्त्रोत फ्लोराईड युक्त आहेत ही बाब लक्षात घेऊन एकुण १६ शासकिय आश्रमशाळा व ०१ एकलव्य शाळांना प्रत्येकी ०३ जलशुध्दीकरण यंत्र या प्रमाणे एकुण ५१ जलशुध्दीकरण यंत्राचा विशेष केंद्रिय सहाय्य योजनेतुन पुरबठा करण्यात आला आहे. ज्या मुळे सर्व आश्रमशाळांवर पिण्याचे शूध्द पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
ईन्सिनेटर मशिन
सर्व शासकिय आश्रमशाळेवर ईन्सिनेटर मशिनचा पुरवठा करण्यात आला असुन, शाळेच्या स्त्री अधिक्षिका व वसतीगृहांचे महिला गृहपाल हे मुलींना मशिन वापराबाबत मार्गदर्शन करतात. मुली या मशिनचा वापर करतात.
सि.सि.टि.व्हि.
सर्व शासकिय आश्रमशाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत सि.सि.टि.व्हि. कॅमेरे लावण्यात आले आहेत.
कायापालट
कायापालट योजनेअंतर्गत सर्व शासकिय आश्रमशाळांना बंक बेड, ड्युलडेस्क, टेबल खुर्ची यांचा पुरबठा करण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यासाठी व शालेय कर्मचारी यांचेसाठी उपयोग करण्यात येतो.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत आयोजीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे मधील सहभाग
शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोधडी येथील विद्यार्थिनी कु.निकिता अर्जुन फोले हिने गोळाफेक या प्रकारामध्ये राज्यस्तरीय पदक मिळविले. तसेच शासकिय आश्रमशाळा जलधरा येथील विद्यार्थी विजय प्रल्हाद चौपाडे यांने कराटे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
देवगिरी कल्याण आश्रम तर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीयस्तरावर निवड
आखिल भारतीय देवगिरी कल्याण आश्रम तर्फे आयोजीत राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकिय आश्रमशाळा तुळशी ब मोहपूर येथील प्रत्येकी चार विद्यार्थिनी सहभाग नोंदवुन प्रथम क्रमांक पटकावला व राष्ट्रिय स्तरावर कानपूर येथे खेळण्याकरीता निवड झाली आहे.
सुसज्ज प्रयोगशाळा
सर्व शासकिय आश्रम शाळेमध्ये शाळाव्यवस्थापन समिती अंतर्गत व एकलव्य फॉऊंडेशनच्या मदतीने सुसज्ज प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या असुन विज्ञान शिक्षक नियमित प्रात्यक्षिके दाखवुन विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ बनवितात.









No comments:
Post a Comment