बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा -खासदार हेमंत पाटील - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 22, 2020

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा -खासदार हेमंत पाटील



किनवट / हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील बहुतांश भागात सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही उगवले नसल्याने  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते, यामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांशी   खासदार हेमंत पाटील यांनी सवांद साधला . कोरोना आणि दुबार पेरणीच्या संकटाने हैराण असलेल्या शेतकऱ्याने आपली व्यथा खासदारासमोर मांडून न्याय द्यावा अशी मागणी केली .यावेळी त्यांनी  बोगस बी - बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे  दाखल करावेत अशी आक्रमक भूमिका घेतली . 
              खरीप  हंगामाच्या सुरवातीला पावसाने चांगली हजेरी  लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली खरी पण जे बियाणे पेरणीसाठी आणले ते उगवलेच नाही. बाजारात आलेल्या नवनवीन कंपन्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक करून बोगस बियाणे  विक्री केले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत बोगस बियाणे विक्री कंपन्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी  मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.  हिंगोली , नांदेड ,यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधिक्षकांना व कृषी अधिक्षकांना तसे निर्देश सुद्धा दिले आहेत . 
              जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाची अशी फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा सुद्धा खासदार हेमंत  पाटील यांनी दिला. याच अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांनी उमरखेड तालुक्याती अमानपूर, सुकळी आणि महागाव तालुक्यातील खडका येथे भेट दिली व  पेरणी कामाची पाहणी केली .  त्यांच्यासोबत  कृषी अधिकारी धुळधुळे, मुकाडे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक अनिल अण्णा नरवाडे, विनायकराव कडम, राहुल सोनूने (माजी नगरसेवक), इंजि. पंडागळे, गजेंद्र ठाकरे, अजय नरवाडे, अतुल मैड, वसंतराव देशमुख, तालुका प्रमुख सतीश नाईक, शहर प्रमुख संदीप ठाकरे, उप तालुकाप्रमुख रवी रुडे, सुकळीचे सरपंच शिवाजी रावते , शाखा प्रमुख भरवाडे, शहर प्रमुख राजू राठोड  शेतकरी  गणेश भिकू राठोड , बोतिबाई  राठोड, ललिता राठोड, लक्ष्मीबाई जाधव,  शैलेश पुरोहित, शिंदे यांची उपस्थिती होती . 
              यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या पहिल्यांदा  पेरणी केलेले पीक उगवले नसल्याने  दुबार  पेरणीची परिस्थिती ओढवली आहे . पण शेतकऱ्यांची दुबार पेरणीची आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकरी सुलतानी संकटाच्या आर्थिक संकटात सापडला आहे . त्यामुळे  शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरिता मदत  मिळावी व बोगस बियाणे , विक्री करणाऱ्या कंपन्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या समवेत असलेल्या कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News