केंद्र प्रमुख सुरेश धम्पलवार यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 1, 2020

केंद्र प्रमुख सुरेश धम्पलवार यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!



1️⃣१ली ते १०वी पर्यंतचे शिक्षण मातृभूमी मुखेड तालुक्यात, डी.एड्. ता.हदगावला,पहिली दोन वर्षे नोकरी खाजगी संस्थेवर,त्यानंतर जि.प.शाळेत शिक्षक,२००६ला पदवीधर शिक्षक,२०१०ला केंद्रप्रमुखपदी नेमणूक; केंद्र तोटंबा(मा.ना.)इथून दि.३१मे२०२०ला वयोमाने ३७वर्षे सेवा करून सेवानिवृत्त...अखंड वास्तव्य किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ इथे स्वतःच्या आलिशान बंगल्यात...
2️⃣ सुखदुःखातही कायम हसरा चेहरा, ऐकतच रहावे असा आवाजाला एक विशिष्ट नाद,वरिष्ठांच्या आदेशाला कधीही नकार द्यायचा नाही अशी नम्र वृत्ती,मदत मागणाऱ्याच्या मदतीला सदैव तत्पर असे धिप्पाड शरीरयष्टीचे,चमकदार विठ्ठलकांतीचे विठ्ठलभक्त, वारकरी केंद्रप्रमुख पदावरून निष्कलंकपणे ३१मे ला सेवानिवृत्त होत आहेत...
3️⃣तेलंगणा,आंध्रच्या सीमेवरील अतिशय दुर्गम, डोंगरदऱ्यांनी,साग वनांनी वेढलेल्या भागात त्यांनी सहजपणे नोकरी केली...
4️⃣काही गावांत अतिशय विचित्र अनुभव आले,शिविअ,केंप्रंना विनाकारण शाब्दिक मानहानी सहन करावी लागली, तरीही हा माणूस विचित्र माणसांना बोलत राहिला, भिऊन पळाला नाही... शिक्षकांच्या पाठिशी कायम खंबीरपणे उभा राहिला...संकटांना भिडत राहिला... मार्ग काढत राहिला...
5️⃣ यथा राजा,तथा प्रजा;जसा वरिष्ठ, तसा कनिष्ठ या न्यायाने कायम वरिष्ठांशी जुळवून घेतले...कधीही संघर्ष होऊ दिला नाही...शाळा,शिविअ, पं.स.मध्ये उत्तम दुवा म्हणून त्यांनी काम पाहिले...
6️⃣ कुण्याही गावात समस्या उभी राहिली की,फोन करायचा अवकाश; तिथे ते तत्काळ हजर व्हायचे...
7️⃣ लॉकडाऊनच्या प्रवास निषिध्द गंभीर काळात मुअंची अडचण ओळखून ४-५शाळांमध्ये स्वतः जाऊन त्यांनी शापोआचा तांदूळ व्यवस्थित वाटप केला...इतके धारिष्ट्य, सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये जागृत होती...
8️⃣ 'नाही' हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता...निवडणुकीचे काम घेता का? बैठे पथकात काम करता का?..या .....शाळेला आता भेट देता का?....अशा परीक्षा घेणाऱ्या प्रश्नांना त्यांनी कायम 'हो'असे उत्तर दिले...पं.स.,तहसील,sdo इत्यादी कार्यालयांत त्यांचा भरपूर परिचय होता, त्याचा आम्हांला बऱ्याच वेळा सकारात्मक फायदा झाला...
9️⃣ शाळेची व्यवस्था लावणे,शिक्षकांच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन लावणे,वरिष्ठांचे संदेश शाळांपर्यंत व्यवस्थित पोचवणे,अहवाल वेळेत पूर्ण करणे,बैठकांना वेळेवर हजर राहणे,गाव व शिक्षकांमधील गंभीर प्रश्न सोडवणे,शिक्षक-शिक्षकांमधील गंभीर प्रश्न सोडवणे,शिक्षकांचे किरकोळ दोष पोटात घालणे,वसंत हंकारेंच्या कार्यशाळेत सक्रिय आर्थिक सहभागी होणे इ.ते सहजपणे करायचे....
🔟 सुरेश धम्पलवार आपली कायम उणीव प्रशासनाला जाणवत राहील....आपल्याला उर्वरीत आयुष्य आयुरारोग्यपूर्ण,सुखासमाधानाचे,आर्थिक स्थिरतेचे,सकारात्मक,आपल्या मनाजोगे जावो,हीच तुमच्या पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना!!!!

-सूर्यकांत बाच्छे,
शिक्षण विस्तार अधिकारी,
इस्लापूर ( किनवट )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News