राष्ट्रमाता अहिल्याबाई : दोन कविता - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 1, 2020

राष्ट्रमाता अहिल्याबाई : दोन कविता



राष्ट्रमाता अहिल्याबाई 


पुण्यश्लोक अहिल्याबाई लोकमाता
तुज शौर्यास आदराने नमवीतो माथा
क्षमाशील , शांत , मनमिळाऊ
होतीस तू गं साऊ अन् जिजाऊ

श्वसुरांनी केले तुज प्रविण विद्येत
बनविले शूर रणरागिणी योद्धेत
सतीप्रथा झुगारून उंचावले मनोधैर्य
प्रजाहिता रक्षिलेस राज्य स्थैर्य 

पतीपुत्रा शोका पचवून स्थिरले मनोराज्य
आणले प्रत्यक्षात कल्याणकारी राज्य 
कैक दुःखानेही न तू खचली दुबळी
तळपती समशेर होतीस एक प्रजाखुळी

न्यायनिवाड्याला नसे राणीच्या तोड
होती मायाळू ही फणसाची फोड
सर्वधर्मसमभावाची होती एक आदर्श 
समाजसुधारक होऊन केला देश उत्कर्ष

होतीस तू एक लखलखीत वीज 
प्रेमाने जनमन केलेस तू काबीज 
होता तुझा एकच मानवता धर्म 
राष्ट्रमाते तू अखंड केले जनसेवा कर्म 

उदार ह्दयाची तू साक्षात अहिल्यादेवी
आजन्म काळजी जपतो तुझ्या कार्याची ठेवी
शिवभक्तमाते तू उंचावल्या स्त्री नजरा
आज शुभ जन्मदिनी तुज असो मानाचा मुजरा 

-अर्चना गरूड
किनवट , जि. नांदेड 
मो. क्र. 9552963376



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

जामखेडच्या चोंडी गावी जन्मली अहिल्या
त्यांच्या कार्यामुळे सदा आठवणीत राहिल्या

माणकोजी व सुशीलादेवीच्या उदरात
पुण्यश्लोक जन्माला आले महाराष्ट्रात

लग्न झाले तेंव्हा वय वर्ष होते आठ
खंडेराव होळकर यांच्याशी पडली गाठ

कुमहेरच्या लढाईत अघटित घडले
खंडेराव होळकर धारातीर्थी तेथे पडले

जाऊ दिले नाही सती सासरे मल्हाररावानी 
माळवा प्रांताची तूच आता तत्वज्ञानी राणी

इंदूरच्या दक्षिणेस महेश्वरला केली राजधानी
एकोणतीस वर्षे माळव्यावर राज्य केले त्यांनी

अनेक हिंदू मंदिराची केली त्यांनी डागडुजी
उचित न्याय देऊन लोकांची सांभाळली मर्जी

इंदूर महेश्वर सारख्या शहरांना सुंदर बनविले
तीर्थक्षेत्री धर्मशाळेचे त्यांनी बांधकाम केले

अहिल्यादेवी होत्या भगवान शंकराचे भक्त
हिंदू देवळाचे जीर्णोद्धार त्यांनीच केले फक्त

- नासा येवतीकर, 
9423625769

।। कोटी कोटी प्रणाम ।।

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News