महागाव : येथील मातोश्री विद्यालयातील विद्यार्थी अनिकेत गजानन भारती हा जवाहर नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाला असून यवतमाळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे.
माहुर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन भारती यांचे ते सुपूत्र आहेत. त्याच्या यशाबद्दल मातोश्री विद्यालय, महागावचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व युनिक कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक देसाई यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.




No comments:
Post a Comment