नांदेड : कोरोना आजारातून आज दहा व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील सहा व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील चार असे एकुण 10 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 219 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. रविवार 21 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 35 अहवालापैकी सर्वच्या सर्व 35 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित न आढळल्याने जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 304 एवढी आहे.
आतापर्यंत 304 बाधितांपैकी 219 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 71 रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत.
यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात 71 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 6 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार 21 जून रोजी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्कोह्यातील कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 830,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 708,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 985,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 304,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 219,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 71,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 79 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 21/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5703
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 5381
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2960
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 89
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 20
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 5361
• आज घेतलेले नमुने - 69
• एकुण नमुने तपासणी- 5708
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 304 (पैकी ०३ संदर्भीत आलेले आहेत)
• पैकी निगेटीव्ह - 4985
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 79
• नाकारण्यात आलेले नमुने - 91
• अनिर्णित अहवाल – 243
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 219
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 14
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145830 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment