कोरोनातून 10 व्यक्ती बरे 34 बाधित तर पाच जाणांचा मृत्य - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 13, 2020

कोरोनातून 10 व्यक्ती बरे 34 बाधित तर पाच जाणांचा मृत्य


नांदेड  : नांदेड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आव्हानात्मक होत असून 13 जुलै रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 34 व्यक्ती बाधित तर 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.  आज एकुण 123 अहवालापैकी 80 निगेटिव्ह अहवाल आले. आजवर एकुण  बाधितांची संख्या 650 एवढी झाली आहे. असे असले तरी आज 10 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 385 बाधितांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.
  
             रविवार 12 जुलै रोजी धनेगाव येथील 9 महिन्याचे एक बालक, लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षाचा पुरुष, मुखेड तबेलागल्ली येथील 85 वर्षाचा पुरुष तर सोमवार 13 जुलै रोजी तसेच कंधार विकासनगर येथील 75 वर्षाचा एक पुरुष, दुलेशाहनगर येथील 61 वर्षाची महिला या कोरोना बाधित एकुण 5 व्यक्तींचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 35 एवढी झाली आहे.
                नवीन बाधितांमध्ये  एस.पी. ऑफिस वजिराबाद परिसरातील 65 वर्षाची 1 महिला, सोमेश कॉलनी येथील 58 वर्षाचा एक पुरुष, चौफाळा नांदेड येथील 78 वर्षाचा एक पुरुष, 20 वर्षाची 1 महिला, वजिराबाद नांदेड  येथील 18,25,47 वर्षाचे 3 पुरुष व 38,44,60,70 वर्षाच्या 4 महिला, इतवारा नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष, कौठा नांदेड येथील 16 वर्षाचा एक बालक व 11 वर्षाची एक मुलगी, आनंदनगर नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, वाजेगाव येथील 63 वर्षाची एक महिला, देगलूर तालुक्यातील अंबिकानगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष, 19 व 43 वर्षाच्या 2 महिला, खानापूर येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर लाईनगल्ली येथील 40 वर्षाचा एक पुरुष, गांधी चौक बिलोली येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 60 वर्षाची एक महिला, मुखेड तबेला गल्ली येथील 50 वर्षाची एक महिला, मदलापूर मुखेड येथील 64 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड येथील 35 व 64 वर्षाचे 2 पुरुष, कंधार विकासनगर येथील 75 वर्षाचा 1 पुरुष, कंधार नांदेड येथील 72 वर्षाचा 1 पुरुष, धर्माबाद मस्ती येथील 23 वर्षाची 1 महिला, लोहा येथील 80 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव येथील 30 वर्षाचा 1 पुरुष तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील 45 वर्षाची 1 महिलेचा यात समावेश आहे.

            आज रोजी 230 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 27 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 12 महिला बाधित व 15 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 333 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.

           आज रोजी एकुण 650 बाधितांपैकी 35 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 385 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 230 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 74, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 62, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 29, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 9, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 9, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 5 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 19 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 8 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.  

▪️जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 794,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 419,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 454,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 34
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 650,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 6,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 35,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 385,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 230,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 333 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 13/07/2020 वेळ 07.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित -8110
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-7264                                                                      • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 4527
अजून निरीक्षणाखाली असलेले - 426
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 67
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 7197
• आज घेतलेले नमुने - 260
एकुण नमुने तपासणी- 8419
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 650(पैकी ०7 संदर्भीत आलेले आहेत)
पैकी निगेटीव्ह - 6854                            • नमुने तपासणी अहवाल बाकी-333
नाकारण्यात आलेले नमुने -124
अनिर्णित अहवाल – 449
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 385
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 35
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 147801 , त्यांनी घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News