शुध्द पर्यावरणासाठी आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे -न्यायाधीश जहांगिर पठाण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 13, 2020

शुध्द पर्यावरणासाठी आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे -न्यायाधीश जहांगिर पठाण


किनवट  : प्रदूषणावर मात करण्यासाठी घनदाट वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे. सजीवसृष्टीच्या साखळीत वृक्षारोपणाला अनन्य साधारण महत्व असून यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण होते, पर्यावरण अबाधित रहाते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची नितांत आवश्यकता आहे. याकरीता आनंदवन घनवन योजना मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  न्यायाधीश जहांगिर पठाण यांनी केले.
       वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान-2020 अंतर्गत 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन अंतर्गत किनवट न्यायालय प्रांगणात न्यायाधीश जे.आर. पठाण, सहन्यायाधिश जे.एन.जाधव यांचे हस्ते घनवन वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
        याप्रसंगी कडूनिंब, पिंपळ, वड, आंबा, कवट आदी रोपवृक्षांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आली. यावेळी वकील संघाचे सचिव ऍड.दिलीप काळे, ऍड. चाडावार, ऍड. अनंत वैद्य, ऍड.एस.डी. राठोड, ऍड. काझी, ऍड.दराडे व इतर वकील, सरकारी अभियोक्ता, न्यायालयीन कर्मचारी व संबंधीत पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News