वाई बाजार येथे उभारण्यात आलेले वेअरहाऊस लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत -सभापती दत्तराव मोहिते - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 14, 2020

वाई बाजार येथे उभारण्यात आलेले वेअरहाऊस लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत -सभापती दत्तराव मोहिते


श्रीक्षेञ माहुर : राष्ट्रीय कृषी विकास योजना,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती माहूर यांचे संयुक्त विद्यमाने वाई बाजार येथे उभारण्यात आलेले वेअर हाऊस लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत सादर होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते यांनी 'निवेदक न्यूज' शी बोलतांना दिली.
 
              वाई बाजार आणि आष्टा ही दोन गावे माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पेठा आहेत.सुमारे ५० खेड्या-पाड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या  वाई बाजार येथे ३५-५ मीटर लांब व १८ मीटर रुंद तसेच ६३९ मीटर एवढ्या विस्तीर्ण अशा परिसरात व्यापलेल्या जागेवर ८६ लाख (इलेक्ट्रिक खर्च १ लक्ष ६० हजार खर्च वेगळा वगळून ) रूपये खर्च करून वेअर हाऊस उभारण्यात आले आहे.त्यात शेतकऱ्यांना १,००० मेट्रिक टन अर्थात १०,००० क्विंटल एवढा शेतमाल ठेवता येणार आहे. बार्शी येथील सुदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीने सदर वेअर हाऊस उभारण्याचे काम पूर्ण करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हवाली केले आहे.

             अनेक खेड्यांना केंद्रस्थानी असलेल्या वाई  बाजारला वेअर हाऊस उभारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना  आपला शेतमाल तारणावर ठेवण्यासाठी यापुढे पुसद -उमरखेड येथे जावे लागणार नसल्याचे सांगून वेअर हाऊस जवळच व्यापारी संकुल उभारण्याचे काम दिवाळी नंतर सुरू करण्याचा मनोदयही सभापती मोहिते यांनी व्यक्त केला. या कामी मोलाचे सहकार्य लाभल्याने त्यांनी पणन संचालक डॉ.सुनील पवार,शिंदे, तांत्रिक अधिकारी गणेश पाटील, सर्व राजकीय मंडळी व आपल्या संचालकांचे विशेष आभार मानले. सुदर्शन कन्स्ट्रक्शन कंपनीने वेळेत काम पूर्ण केल्या बद्दल मोहिते यांनी त्यांचेही ऋण व्यक्त केले.यावेळी त्यांचे समवेत उपसभापती अनिताताई मूनगिनवार, दिलीप मूनगिनवार व मंचकराव देशमुख,सुजित बेहेरे,धनंजय तौर यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News