शिवणी (प्रकाश कारलेवाड) : किनवट तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी महिलचे शेतातील आखाड्यावर सर्पदंशाने निधन झाले. या बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
जनाबाई नारायण कऱ्हाळे वय वर्षे ५५. ह्या मंगळवारी ( दि.२१ जुलै रोजी ) सकाळी ठीक आठ वाजता चहा करण्यासाठी आपल्याच शेतातील आखाड्याच्या बाजूला असलेल्या तुराट्या व काही सरपण (लाकडे ) आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका विषारी जातीच्या सापाने त्यांच्या डाव्या पायाला डंक मारला. त्या किंचाळल्याने ही बाब निदर्शनास आल्याने लगेच या महिलेचा भाऊ जयवंतराव भिसे यांनी बैल गाडीत टाकून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी येथे आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. यु.पोघे यांनी तपासणी करून मृत घोषित केले व शव विच्छेदन करून मृतदेह परिवारास सुपूर्द केले. सदरील घटनेची खबर इस्लापुर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. त्यावरून शिवणी बिटचे जमादार एन. एम. तांबरे यांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूचा गुन्हा नोंद केला.




No comments:
Post a Comment