किनवट : “शेतकऱ्यांना बांधावर खत देऊ” ही घोषणा देऊन शेतकऱ्यांना फवसणाऱ्या राज्य सरकारने स्वतः चे नाव महाविकास आघाडी असे ठेवले आहे परंतु ते महाविकास आघाडी नसुन महाबिघाडी असे ठेवले पाहिजे. शेकऱ्यांना तात्काळ खते उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे यांनी दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना युरीया व तत्सम खते उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.या वर्षाच्या सुरवातीपासुनच शेतकऱ्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. अतिवृष्टी नंतर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने फळ उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यानंतर पावसाने मारलेली दडी तर पेरलेले बियाणे हे वांझोटे निघाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. एवढ्या समस्याचा सामना करता कसेबसे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील आपली पीके जगवलीत.
त्यानंतर आता या पिकांना जीवदानासाठी खतांची गरज आहे. परंतु शासनाच्या दिरंगाई व निष्क्रीय प्रशासनामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना युरीया खताचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शासनाविरुध्द मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे यांनी दिला.' निवेदक न्यूज'शी बोलतांना ते म्हणाले की, राज्यातील जनादेश हा महायुतीच्या बाजुने होता. परंतु राज्यात अभद्र आघाडीकरुन आलेले सरकार हे अनैतिक असुन त्यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा कोणताही अधिकार नाही. कोरोना विषाणुच्या नावावर प्रशासनातील अकार्यक्षमपणा लपवण्याचा प्रकार सध्या चालु असुन राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार आहे. मुख्यमंत्री हे अपघाताने राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसले आहेत. तिन्हीही पक्षांनी आपल्या विचारधारेला तिलांजली देऊन एकमेकांसोबत जुळवुन घेतले आहे, ते सत्तेच्या लालसेने तिथे बसले असुन लोकांचे प्रश्न सोडवने हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट नाही. अशा अभद्र सरकार कडुन जनतेने जास्त अपेक्षा ठेऊ नये, परंतु शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अन्यथा भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेउन रस्त्यावर उतरुन शासनाला भानावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.




No comments:
Post a Comment