"तरुणांना घडवणं" यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त ऑनलाइन वेबिनार संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 28, 2020

"तरुणांना घडवणं" यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त ऑनलाइन वेबिनार संपन्न



           
         
उमरखेड ( यवतमाळ ) : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (ता.27 जुलै 2020 रोजी ) दोन सत्रात ऑनलाइन वेबिनारचे  आयोजन करण्यात आले होते.
               सकाळच्या सत्रात डी. आर. डी. ओ. चे चेअरमन डॉ . सतीश रेड्डी, तरुण  मृगेश चेन्नई, डी. जयकुमार, अर्चना श्रीधरणे यांनी डॉ. कलाम यांचे महान कार्य सांगून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रोत्साहित केले. "तरुणांना घडवणं" हा डॉ. कलाम यांचा ध्यास पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला  प्रचंड मेहनत करायची आहे. भारताला  फार पुढे न्यायचे आहे. प्रेम, सकारात्मकता , मूल्यांची जपणूक,जीवनविषयक तत्वज्ञान, स्वप्न पाहणं आणि परीश्रमाचे महत्व सांगून प्रेरीत केले.
         दुसर्‍या सत्रात  मार्गदर्शनासहित विद्यार्थी आणि सहभागी शिक्षकांमध्ये प्रश्नोत्तरे घेण्यात आली. आपल्याला पडलेले प्रश्न मांडण्याची संधी वेबिनार मध्ये सहभागी असलेल्यांना मिळाली. 

             या वेबिनारमध्ये महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक  जयश्रीताई शिरसाटे, महाराष्ट्र राज्य समन्वयक गजानन गोपेवाड, लातूर जिल्हा समन्वयक  वैशालीताई चव्हाण, शिक्षिका जयश्रीताई खोंडे, धुळे जिल्हा ग्रामिण समन्वयक अविनाश पाटील, साक्री तालूका समन्वयक नारायण भिलाणे, उमरखेड तालुका समन्वयक ओमकार चेके , डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम फाऊंडेशनचे मिलिंद चौधरी व  मनिषाताई चौधरी यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News