किनवटमध्ये आता आणखी 6 बाधितांची भर पडल्याने आजचे एकूण पॉझिटिव्ह झाले 9 ; तर उपचार घेताहेत 34 रुग्ण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 5, 2020

किनवटमध्ये आता आणखी 6 बाधितांची भर पडल्याने आजचे एकूण पॉझिटिव्ह झाले 9 ; तर उपचार घेताहेत 34 रुग्ण



किनवट  : किनवटमध्ये आज बुधवारी (दि. पाच) रात्री 8 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 6 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आजचे एकूण पॉझिटिव्ह 9 झालेआहेत. तसेच बाधित रूग्णांची एकूण संख्या  वाढून आता 42 झाली आहे. कोरोनातून बरे झाल्याने सुटी होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 7 जण आहेत. बाधितांपैकी संदर्भित 3 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 31 असे एकूण 34 रुग्ण उपचार घेत आहेत. 
               बुधवारी (दि. पाच ) सकाळी 11 वाजता आरटीपीसीआर टेस्टनुसार मोमीनपुरा, किनवट  येथील 19 वर्षे वयाचा एक, 24 वर्षे वयाचा एक अशा 2 पुरुषांचा व 43 वर्षे वयाच्या एका महिलेचा याप्रमाणे एकूण तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता.  तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे उपचार घेणाऱ्या इस्लामपूरा, किनवट येथील  60 वर्षे वयाच्या एका बाधित पुरुष रुग्णाचा मंगळवारी (दि. चार ) रात्री 11.30 वाजता मृत्यू झालेला आहे.
               बुधवारी (दि. पाच) रात्री 8 वाजता  रॅपिड एँटिजेन टेस्ट पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत कोल्हारी येथील 35 वर्षे वयाचा 1 पुरुष, किनवटच्या एस .व्ही.एम. कॉलनीतील 37 वर्षाचा 1 व 57 वर्षाचा 1 पुरुष आणि 52 वर्षाची 1 महिला तसेच्या गोकुंदा येथील आदिवासी कॉलनीतील 53 वर्षाच्या 1 पुरुषाचा अशा 6 जणांचा अहवाल पॉलिटिव्ह आढळला आहे. आजचे एकूण नवीन बाधित 9 रुग्ण झाले आहेत. 
               त्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी कोल्हारी, आदिवासी कॉलनी, गोकुंदा व खैरुदीन मार्ग,किनवट कंटेन्मेंट झोन जाहीर केला व यासह शहरातील एस. व्ही. एम. कॉलनी, मोमीनपूरा, इस्लामपूरा, राजेंद्रनगर व तालुक्यातील तल्लारी, राजगड तांडा, लोणी व शिवणी या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत. 
                  डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 15 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 6 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 16 ( आरटीपीसीआर 7 + रॅपिड 9 ) व पूर्वीच संदर्भित 3 अशा एकूण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 05/08/2020 रात्री 8 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 216,
निगेटिव्ह स्वॅब- 168,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 3
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 4
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4, 

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट - 30
 निगेटिव्ह अहवाल - 24
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 6

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 9
मृत्यू संख्या- 1, 
आतापर्यंतचे एकुण पॉझिटिव्ह व्यक्ती- 42, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 31 + संदर्भित रुग्ण 3     

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News