नायगांव (नांदेड) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये नायगांव तालुक्याच्या शेळगांव (गौरी) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकून याच गावचा भूमीपुत्र असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या मुलाने युपीएससी परिक्षेत घवघवीत यशाची भरारी घेतल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,नायगांव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील योगेश अशोक बावणे यांना पहिल्या परिक्षेत आय,पी.एस व दुसऱ्या यूपीएससी परीक्षेत 63 वा रँक मिळाला आहे. विशेष म्हणजे योगेश यांचे शालेय शिक्षण शेळगांव गौरी येथील जि. प. शाळेत झाले आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे कै. रामचंद्र पा. मा. विद्यालय शेळगांव गौरी येथे झाले असून त्याचे वडिल आशोक रामराव बावणे हे जि.प.शाळेचे शिक्षक आहेत तर आई गृहिणी.
शेळगांव गौरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन योगेश आशोक बावणे यांनी दुसर्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कठोर मेहनत आणि सरावात सातत्य राखत योगेश यांनी अभिमानास्पद यश प्राप्त केले असल्याने संपूर्ण राज्यातून योगेश बावणे यांचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंगदादा पाटील, माधवराव पाटील शेळगांवकर, संरपच उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, चेअरमन सुनिल रामदासी, सतोष देशमुख, प्रकाश शिपांळे आदिंसह शेळगांव गौरी, नायगांव तालुका व नांदेड जिल्ह्यातील अनेकांनी त्याचेवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षांव केला आहे.




No comments:
Post a Comment