बहुभाषा संगम संस्था हुबळी द्वारे आंतरराष्ट्रीय बहु भाषी कवी गोष्ठी ऑनलाईन संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 7, 2020

बहुभाषा संगम संस्था हुबळी द्वारे आंतरराष्ट्रीय बहु भाषी कवी गोष्ठी ऑनलाईन संपन्न

 

 (आशा रणखांबे)

कल्याण (ठाणे) :  साहित्य आणि समाज यांचा संबंध सदैव राहिलेला आहे. समाजामधील अशुभ घटना आणि  वाईट वृत्ती दूर करून समाज घडविणे, विश्वाचे कल्याण करण्याचे काम साहित्य करत असते. भारतातल्या विविध भाषा बोलणाऱ्या कवींनी आपल्या कवितेद्वारे प्रेम, दया आणि शांतीचा  संदेश दिला आहे.  कोरोना काळातही चांगले साहित्य निर्माण होत आहे. बहु भाषा संगम संस्थेने आंतरराष्ट्रीय कवी गोष्ठी मध्ये भारत , नेपाळ, जर्मन , अमेरिकेतील कवींना जोडून एकतेचा एक संदेश दिला आहे. 

              प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ विशेषाधिकार डॉ. अलका पोतदार यांनी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कवी गोष्ठीच्या सफलतेसाठी संस्कृत, हिंदी, मराठी, कन्नड, अवधी , छत्तीसगढी, हरियाणवी, भोजपुरी, भाषेच्या कवींना शुभेच्छा देत कविता सादर केली. यावेळी अध्यक्षा डॉ. विद्यावती राजपूत होत्या तर अक्कमहादेवी, सचिव प्रा . धन्यकुमार जिनपाल बिराजदार आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

              याप्रसंगी  नेपाळचे विष्णू लाल कुमाल , जर्मनीचे  डॉ. रामप्रसाद भट्ट, महाराष्ट्रामधून जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,  ऍड. प्रज्ञेश सोनावणे,  वेगवेगळ्या राज्यातून आणि देशातून कवींनी सहभाग घेतला .दीपक मुदलियार, राजबाला राज, माताचरण मिश्र, उमाकांत त्रिपाठी, डॉ. मंजुला चव्हाण, जयप्रकाश सूर्यवंशी, डॉ. प्रमोद शुक्ल, छत्र छाजेड, धर्माजी राव साळुंखे इ . मान्यवर कवींचा सहभाग होता तर दोन दिवस चाललेल्या आंतरराष्ट्रीय  कवी संमेलनात एकूण १२५ कवींनी सहभाग घेतला. 

                  श्रावण महिन्याबरोबरच हास्य, व्यंग, कोरोना काळ, राष्ट्रीय एकात्मता, गरिबांच्या वेदना, विश्वबंधुता, हिंदीची दक्षा, भारतीय संस्कृती, कन्या भ्रूण हत्या, प्रेम इ. विषयी स्वरचित कविता कवींनी सादर केली.     

           कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन  सचिव प्रा. धन्यकुमार जिनपाल बिराजदार यांनी केले तर  डॉ. विद्यावती राजपूत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News