किनवटच्या बस स्थानकात वंचित बहुजन आघाडीने केले डफली बजाव आंदोलन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 12, 2020

किनवटच्या बस स्थानकात वंचित बहुजन आघाडीने केले डफली बजाव आंदोलन

 


किनवट : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील परिवहन महामंडळाच्या सर्व बस सेवा सुरु करण्यात याव्या या मागणीसाठी एकाच वेळी राज्यभर डफली आंदोलन करण्याच्या आवाहनानुसार वंबआच्या तालुका शाखेच्या वतीने येथील बसस्थानकात आंदोलन करण्यात आले .

         निवेदनात असे नमूद केले की, एकीकडे  कोरोनामुळे लॉकड़ाऊन असल्याने सर्व वाहतुक कामे ठप्प झालीत व  कोरोना पेक्षा उपासमारीमुळे मरण्याची लोकांनवर वेळ आली आहे. आज चार महिन्यापासून लोक अडकून आहेत, लाखो लोकांचे पोट हातावर आहे, काम करावे तर खावे आहे, अशा स्थितीत तात्काळ बस सेवा सुरु करुन लोकांची होणारी हेळसांड थांबवावी या मागणीसाठी बसडेपो समोर बुधवारी (दि .12 ) डफली आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता.

         त्या अनुषंगाने किनवट येथे बुधवारी (दि.12 ) सकाळी ठिक 10:00वा.डफली आंदोलन करण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके,तालुका महासचिव दीपक ओंकार,  ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर नगराळे, तालुका उपाध्यक्ष दयानंद काळे, तालुका प्रवक्ते मिलिंद वाठोरे, शहराध्यक्ष अक्रम खान,शहर उपाध्यक्ष राजू नरवाडे, सहसचिव सम्राट कावळे,शहर युवा अध्यक्ष अक्षय कावळे,दया पाटिल,विशाल नवरंगे,मिलिंद भालेराव बाळु कवडे,आशिष कांबळे,संदेश चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News