किनवट : दिव्यांग उपोषणार्थी नालीत पडून घायाळ ( बेशुद्ध ) झाल्याने तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे उपचारार्थ दाखल केले आहे .
दिव्यांगाच्या ३ टक्के निधी वाटपात गैरव्यवहार करणारांवर गुन्हा दाखल करावा , या मागणीसानी पंचायत समिती कार्यालया समोर शुक्रवारी (ता. १४ ) पासून आमरण उपोषण सुरु केले आहे . अखिल भारतीय अपंग कामगार संघटेनेचे शहराध्यक्ष सलाम बागवान हेही उपोषणास बसले आहेत . दिवसभर पावसाने उपोषणार्थी संपूर्ण भिजले , टेंट गळू लागला तरीही उपोषणार्थी रेटून बसून आहेत .
शुक्रवारी रात्री ११ वाजता सलाम बागवान हे उपोषण स्थळाच्या बाजूला लघूशंकेसाठी गेले असता तोल जाऊन नालीत पडले . त्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. त्यामुळे तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय , गोकुंदा येथे दाखल केले. तिथे त्यांचेवर उपचार सुरू आहेत .




No comments:
Post a Comment