किनवट : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजवंदनप्रसंगी कोरोना जनजागृती कक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचा गौरव करतांना आमदार भीमराव केराम, तहसिलदार उत्तम कागणे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक व नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ( छाया : अनिल इंगोले )
किनवट : येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिना निमित्त मुख्य ध्वजवंदन प्रसंगी कोविड -19 मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी कार्यालयात प्राधिकृत अधिकारी तहसिलदार उत्तम कागणे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने मानवंदना दिली. प्रसिध्द गायिका आम्रपाली वाठोरे ( कांबळे) यांनी राष्ट्रगीत व देशभक्ती गीत गाईले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी कोविड-19 साथ काळात उत्कृष्ठ कार्य केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार बोडखे, डाॅ. भाग्यश्री वाघमारे, अधिपरिचारिका सुवर्णमाला घोळवे, आरोग्य सेविका रेवती साखरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ धम्मपाल दवणे, समुपदेशक पंकज राठोड, वाहन चालक रमेश कुरपटवार, कक्ष सेवक जावेद खुर्शिद बेग व कोरोना जनजागृती कक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचा तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस मुक्ताबाई निवृत्ती सावते यांचा आमदार भीमराव केराम, तहसिलदार उत्तम कागणे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी गटविकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, तालुका कृषि अधिकारी संजय गायकवाड, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, साजीद खान, डॉ. अशोक बेलखोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, सर्वेश मेश्राम, के. डी. कांबळे, अशोक कांबळे, अनिल सूर्यवंशी, रामेश्वर मुंडे, गोविंद पांपटवार, राम बुसमवार आदींनी पुढाकार घेतला.








No comments:
Post a Comment