पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांना मातृशोक : चंद्रभागाबाई भरणे यांच्या पार्थिवावर आज झाले अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 26, 2020

पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांना मातृशोक : चंद्रभागाबाई भरणे यांच्या पार्थिवावर आज झाले अंत्यसंस्कार

 



किनवट : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांना मातृशोक झाल्याबद्दल अनेकांनी प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीद्वारे मातोश्रींना आदरांजली अर्पूण त्यांचे सांत्वन केले.

            आंबेडकरी चळवळीचं केंद्र असलेल्या सिध्दार्थनगर येथील रहिवाशी तथा समस्त कार्यकर्त्यांच्या आई चंद्रभागाबाई नागोराव भरणे ( वय 88 वर्षे ) यांचं मंगळवारी ( दि. 25 ) रात्री 9.25 वा. निधन झालं. त्यांचे पश्चात पती (कॉस्मॉपॉलिटन विद्यालयाचे निवृत्त कर्मचारी नागोराव भरणे ), पाच मुलगे व 1 मुलगी, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे.

            बुधवारी (दि. 26 ) सकाळी 11 वाजता बसस्थानकाजवळील शांतीभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे, किसान सभेचे राज्य सचिव कॉ. अर्जून आडे, पत्रकार शकिल बडगुजर, सेनेचे ज्येष्ठ नेते व्यंकट भंडारवार, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, डॉ. विजय कांबळे, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, बसपाचे किशनराव ठमके, बेला मंडलचे माजी सरपंच तेजेराव मस्के, आगारप्रमुख मिलिंद सोनाळे, देविदास मुनेश्वर आदिंनी पुष्पांजली वाहिली. 

            पीरिपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे, युवा नेते जयदीप कवाडे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, निवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी जहारवाल  यांनी भ्रमणध्वनीद्वारे व पीरिपचे राज्य उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेवक बापूराव गजभारे, जिल्हा नियोजन समिती सदस्य उपेंद्र तायडे, पीरिपचे मोहन गर्दनमारे, संघरत्न खंदारे, सतीश बनसोडे, युवा नेते कुलदीप चिकाटे यांनी गृहभेट घेऊन मातोश्रींना आदरांजली अर्पूण विनोद भरणे यांचे व समस्त भरणे परिवाराचे सांत्वन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News