दिलखुलास' कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची मुलाखत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 26, 2020

दिलखुलास' कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची मुलाखत

 



  मुंबई,दि.२६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'दुग्धव्यवसायाचे बळकटीकरण, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन' या विषयावर पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय   विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून   गुरूवार दि.२७ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲप वरही याच वेळेत ऐकता येईल.  निवेदिका  शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत  राज्यात लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाच्या मागणीत झालेली घट  लक्षात घेता घेण्यात आलेले निर्णय, दुधात भेसळ होवू नये यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, अतिरिक्त दुधाचे  भुकटीत रूपांतर करण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय, मिशन ऑलिम्पिक योजनेअंतर्गत खेळाडूंसाठी केलेली तरतूद, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ यासंदर्भात  सविस्तर  माहिती मंत्री केदार यांनी दिली आहे.                                                       


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News