राजू सुरोशे यांची रोहितदादा युवामंच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 2, 2020

राजू सुरोशे यांची रोहितदादा युवामंच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

 



किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी  येथील युवा नेतृत्व राजू सुरुशे यांची रोहितदादा युवा मंचच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली.

             ते गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. तसेच तळागाळातील माणसांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे त्यांच्या कार्याची सूत्र आहे म्हणूनच की काय तर पक्षाने किंबहुना रोहितदादा युवा मंचच्या महान पदाधिकाऱ्यांनी राजू सुरोशे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच तळागाळातील  पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तींना न्याय देतो व त्या कार्यकर्त्याचा पक्षाच्या कार्याचा सन्मान करतो म्हणूनच मौजे घोटी या  आदिवासी भागातील सामान्य कार्यकर्त्याची रोहितदादा युवा मंचच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे डॉ. सुनील कदम  यांच्या उपस्थितीत देण्यात आले. 

             यावेळी रोहितदादा युवा मंचचे उपाध्यक्ष बंटी आडे , जिल्हा सह सचिव बालाजी पाटील पळसपुरे,पक्षाचे नेते ऍड.सचिन जाधव (कार्याध्यक्ष), रो.दा.प. मंचचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर, युवा नेते धंनजय सूर्यवंशी, बालाजी बामणे,जयवंत वानोळे, सशु पाटील, बालाजी पाटील टेकाळे, गोविंद अरसोड, शिवा पवार आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News