किनवट : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे-05 या महाविद्यालयातील अंतीम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड-19 प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट "रावे" हे प्रत्येकाच्या स्थानीक ठिकाणी करणेबाबत विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत सदर महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सुशांत प्रशांत ठमके याने मौजे सिरमेटी ता.किनवट जि.नांदेड येथील प्रगतशिल शेतकरी शंकर जाधव( होस्ट फॉर्मर ) व इतर शेतकऱ्यांची बैठक व मुलाखती घेवून माती परिक्षणाचे महत्व सांगीतले. जैविक शेतीचे फायदे पटवून दिले.
पिकांच्या सुदृढ वाढीसाठी जिवामृत कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक केले. शेतकऱ्यांसोबतच्या संवादात शेतीनिगडीत शासकीय योजनांची व सेंद्रीय शेतीबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या अडचणींवर योग्य ते उपाय सांगीतले. तसेच त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी भीमपूर - सिरमेटीचे सरपंच नागोराव लक्ष्मण मेश्राम, शंकर रामचंद्र जाधव ( होस्ट फॉर्मर), शामराव भीमराव मेश्राम, संभाजी सीताराम आतराम, रामराव भीमराव मेश्राम, माधव संभा मेश्राम, व्यंकट देवराव धुर्वे, केशव लक्ष्मण मडावी, संजय धर्माजी उईके, शेषेराव भिमराव सलाम, सीताराम भिमराव सलाम ह्या आदिवासी शेतकऱ्यांसह इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.





No comments:
Post a Comment