भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 4, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन

 


नांदेड (जिमाका) दि. 4 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनु. जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे काही प्रश्न अथवा स्वाधार योजनेबाबत त्यांना काही माहिती हवी असल्यास थेट सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे चौकशी करावी. कार्यालयाबाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये अथवा कोणत्याही अमिषास बळी पडू नये. तसेच कार्यालयाबाहेरील इतर कोणत्याही अनभिज्ञ व्यक्तीशी अथवा अधिकृत व्यक्तीशिवाय विद्यार्थ्यांनी अनाधिकृत व्यक्तींशी संपर्क केल्यास होणाऱ्या सर्व परिणामाची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्यांची राहिल याची नोंद घ्यावी. संबंधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत कार्यासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News