किनवट : कोव्हिड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विवीध माध्यमातून,उपक्रमांतून मूलांचे शिक्षण सुरू आहे त्यासाठी शिक्षक नवीन कौशल्ये व तंत्रज्ञानाचा वापर करित आहेत.
नांदेड जिल्ह्यातील किनवट या अदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिदासतांडा ही एक प्रयोगशील शाळा आहे. येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी सेलुकर यांनी "घरोघरी अभ्यास- गृहभेटीतून साधला गुणवत्ता विकास" हा उपक्रम शाळेत राबविला. शाळा बंद असल्यातरी आँनलाईन क्लास, व्हाट्स अॅप ग्रुप याद्वारे विद्यार्थ्यांशी व पालकांशी संपर्क ठेवला. आठवड्यातून एकदा गुगल मीट (Google Meet) तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गावातील तरूण शिक्षित वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांची त्यांना मोलाची साथ आहे.
सर्वच पालकांकडे स्मार्ट फोन नसतात त्यामुळे तंत्रज्ञानातून शिक्षण सर्वांनाच मिळतेच असे नाही हे जाणून त्यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन ज्ञानदानाला सुरूवात केली. कोरोना काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क आणि सोशल डिसटन्स ठेवत गृहभेटीतून मार्गदर्शन केले. अभ्यास देण्यासाठी गुंडाळ फळा व घराच्या अंगणातील फरशीचा वापर केला. विद्यार्थ्यांंना अभ्यास देण्यासाठी घराबाहेरचा परिसर निवडला. प्रत्यक्ष गृहभेटी नियोजनातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढू लागली.
घरोघरी अभ्यास संकल्पनेत सह्याद्री वाहिनीवरील टिलीमिली कार्यक्रम रोहिदासतांडा शाळेतील विद्यार्थ्याना खूपच उपयुक्त ठरला. प्रत्यक्षात मूले टिलीमिलीच्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम पाहत आहेत का ?पाहत असल्यास शिकवलेला घटक कोणता ? याविषयी ह्या शिक्षिका विद्यार्थ्यांना माहिती विचारतात. टिलीमिली प्रक्षेपणवेळात प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पाहणी करतात.
पालक शाळेच्या व्हाॅटस अॅप ग्रुपवर घरी केलेल्या अभ्यासाचे व कृतीचे फोटो व व्हिडिओज पाठवतात. त्यानूसार शिक्षक अभ्यास तपासून मार्गदर्शन करतात. शिक्षक स्वनिर्मीत तसेच इतर उपयोगी असलेल्या व्हिडीओ माध्यमातून मूलांना माहिती देतात. दैनदिन अभ्यास व मासिक अभ्यासमाला विद्यार्थ्यांना दिल्यामूळे मूले ती घरी सोडवतात. याशिवाय घरोघरी दिक्षा ऍपचा वापर विद्यार्थ्यांकडून केला जातो. शिक्षक मार्गदर्शनाने काही विद्यार्थी दिक्षा ऍपच्या माध्यमातून पुस्तकातील पाठ्यघटक स्कॅन करून पाहतात. दिक्षा ऍप नोटिफिकेशनही वाचून आलेले व्हिडोओ मूले पाहतात.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्नशील असलेली रोहिदासतांडा येथील शाळा आहे.
- संतोष ताडेवार,
ग्रामसेवक, कमठाला





No comments:
Post a Comment