बाळापूर ( कळमनुरी ) : हिंगोली जिल्ह्यात असलेल्या कळमनुरी तालुक्यातील रेडगांव येथील प्रगतिशिल शेतकरी उत्तमराव पाटील सवंडकर यांच्या शेतातील गोठ्यातील बैलजोडीवर अज्ञात ईसमाने सूड बुद्धीतून विषप्रयोग करून दोन्ही बैलांना ठार केले आहे …
सदरील घटना ही गणपती विसर्जनाच्या दिवशी घडली असून अगोदर कोरोना त्यानंतर अतिवृष्टी आदी आस्मानी संकटानी हैराण झालेल्या शेतकऱ्यावर अशा प्रकारच्या घटनेनं फार मोठे संकट ओढवले आहे. सदरील घटनेमुळे उत्तमराव सवंडकरच नाहीतर परिसरातील पुशपालक हैराण झाले असून अशा प्रकारची घटना पंचक्रोशीतील ईतिहासात पहील्यांदा घडल्याची बोलकी प्रतिक्रिया चहू बाजूने ऐकायला मिळत असून या घटनेने पशुपालक हादरले आहेत आणि सदरच्या घटनेची पोलिस प्रशासनाने स्वतः लक्ष देऊन अशिक्षित शेतकरी बांधवांला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रेडगांवातून होत आहे … आज जर अशा माथेफिरूवर योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास परिसरात अजून अशा घटना घडण्याची शक्यता शेतकरी बांधव बोलून दाखवत आहेत ….
सदरील बैलजोडीवर आजूबाजूच्या पंधरा-वीस शेतकऱ्यांची शेतीकामासाठी मदार असतांना आणि मागील त्याला ही बैलजोडी उपलब्ध होत असतांना सदरील माथेफिरू व्यक्तीच्या कृत्यामुळे उत्तमराव सवंडकर यांच्या आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे .. त्यांच्याशी आमच्या संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते कुठलीही प्रतिक्रीया देण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांच्या डोळयासमोर सोडलेल्या दोन्ही बैलांची प्राणज्योत त्यांच्या डोळ्या पूढून जात नव्हती ….त्यांनी खचलेल्या मनस्थितीत फक्त मुक्या जनांवरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आशा व्यक्त केली ….
बैलजोडी विषाच्या परिणामामुळे वेगाने फुगत असल्याने आम्ही तातडीने त्यांच्या मौतीचा निर्णय घेतला ईतकीच प्रतिक्रीया त्यांनी शेवटी नोंदविली. पण या मुक्या जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने स्वतः पुढे येत पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी व गावकऱ्यांनी केली आहे …..
संपर्क – उत्तमराव नामदेवराव सवंडकर , रा. रेडगांव पोस्ट – जवळा पांचाळ
तालुका – कळमनुरी , जि. हिंगोली … मोबाईल - ९६३७३०६१४८




No comments:
Post a Comment