डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड ने कवी नवनाथ रणखांबे सन्मानित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 9, 2020

डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड ने कवी नवनाथ रणखांबे सन्मानित

 




 तासगाव (सांगली) : अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने सलग ८५ तास चालणारे कविसंमेलन ठाणे येथील संकल्प इंग्लिश स्कुल येथे आयोजित केले गेले होते.   

       साहित्य क्षेत्रात ठसा  उमटवणारे हरहुन्नरी तासगांवचे कवी नवनाथ रणखांबे  यांनी विक्रमी कविसंमेलनात    सहभाग  घेतला होता.  या कविसंमेलनाच्या   विक्रमाची ऐतिहासिक डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद  झाली आहे.  त्यामुळे  कवी नवनाथ रणखांबे यांची  डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये  सहभागाची नोंद झाली असून त्यांना  उपक्रम प्रमुख डॉ. योगेश जोशी यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले आहे.

     


   आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तरीय आणि विविध पुरस्काराने सन्मानित असलेले कवी नवनाथ रणखांबे हे  इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित आहेत.

        मला ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांच्यामुळे आणि माझ्या  परिवाराच्या सहकार्याने  हे यश मी संपादन करू शकलो असे नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलताना मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News