ठाणे : देशात बालशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या, बालवाडीसह विविध प्रयोग करणा-या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या स्मृती दिनानिमित्त लहान मुलांच्या जीवनावर, त्यांच्या समस्यांवर ऑनलाईन कवी संमेलन व व्याखानाचे आयोजन दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता, भिवंडी तालुक्यातील सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेच्या वतीने झूमअॅप वर घेण्यात आले. यावेळी प्रा. राष्ट्रपाल काकडे दिग्दर्शित ''शिक्षा'' लघुचित्रपट दाखविण्यात आले. तर चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी ''बचपन बचाओ मानवता बचाओ'' या विषयावर मार्गदर्शन केले.
भारतीय बालक हुकूमशाही मध्ये जगत आहे , घराघरात मुलांना गुलाम म्हणून वापरले जात आहे , मुलांना रॅट रेस नध्ये ओढल्यामुले खूप नुकसान झाले आहे अशा मुलांना आज मुक्त व निर्भय वातावरणात काम करू द्या असे रोखठोक प्रतिपादन दर सोमवारी बालकांच्या अधिकारासाठी उपोषण करणाऱ्या चिरंजीवी संघटनेच्या अध्यक्षा भारतीय ग्रेटा अवली म्हणजेच सलोनी तोडकरी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. प्रबोधनाचे काम वाढवले पाहिजे याचा जोरदार पुरस्कार केला. लहान मुलं भीक मागतांना दिसत आहेत. बालमजुरी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना स्वरक्षण नाही अशा लहान मुलांच्या विविध विषयांवर सलोनी तोडकरी यांनी आपले विचार मांडले.
लहान मुलांच्या समस्यांवर, वास्तविक जीवनावर, लहान मुलांच्या प्रश्नांवर विजयकुमार भोईर (भिवंडी), नवनाथ रणखांबे (कल्याण), अॅड. प्रज्ञेश सोनावणे (ठाणे शहर), मिलिंद जाधव (भिवंडी), भटू जगदेव (भिवंडी), राष्ट्रपाल काकडे (विरार), अॅड. श्रीकृष्ण टोबरे (भांडूप), प्रा. ज्योती पंडित (परभणी), प्रणाली जाधव (मुंबई), प्रा. विशाल गायकवाड (भिवंडी), वृषाली माने (मुलुंड), हर्षाली खरे (भिवंडी), श्वेता भालेराव (भिवंडी), क्रांती देवस्थळे (आर्णी), अंजली पगारे (उल्हासनगर), अंगद निकम (केज), इत्यादी कवी,कवयित्री यांनी आपल्या कवितेतून लहान मुलांच्या समस्येवर प्रहार केले.
कोरोनाचा विषाणू वाढत असल्याने झूमअॅपच्या माध्यमातून सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेच्या वतीने बालस्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात नवोदित कवी, साहित्यिकांनी त्यांचे विचार कवितेतून मांडण्यासाठी विचारमंच उपलब्ध करून दिला आहे. असे सर्वोदय अभिनव सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरज खरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी निर्मिती फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष मनोज खरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले. तर आभार सूरज खरे यांनी केले.




No comments:
Post a Comment