किनवट : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी किनवट येथिल कोविड सेंटर व उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट दिली व पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी किनवट -माहुर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी आमदार केराम यांनी आरोग्य समस्याबाबत चर्चा केली. येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लॅब टेक्निशियन आदी जे इतरत्र प्रतिनियुक्तीवर आहेत त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करुन त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जागेवर त्वरीत उपस्थित होण्याचे आदेश देण्यात येतील, तसेच उत्तम दर्जाचे भोजन व ऑक्सिजन पुरवठा करण्यात येईल त्यात कोणत्याही प्रकारे खंड पडु देणार नाही. याकरिता ऑक्सिजन निर्मितीचे प्लॅन्ट किनवट येथे कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आ. केराम यांना यावेळी दिली. या सोबतच आवश्यकतेनुसार किनवट येथील सि.सि.सि व गोकुंदा येथील डि.सि.एच.सी मध्ये वैद्यकीय अधिकारी व परिचारिका, सेवकांची नियुक्ती करण्याचे अधिकार प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांना देण्यात आले आहेत, त्यानुसार ते सहायक जिल्हाधिकारी व आपल्याशी समन्वय साधुन रुग्णांना गैरसोय होणार नाही याची काळजी घेतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी संवाद साधतांना आ.केराम म्हणाले की, किनवट व माहुर तालुके हे जिल्ह्याच्या ठीकाणापासून १५० कि.मी अंतरावर आहेत, त्यामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात.
यावेळी आमदार केराम यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, नगरसेवक शिवा आंधळे, डॉ.शिलेदार, डॉ. उत्तम धुमाळे हे उपस्थित होते.




No comments:
Post a Comment