नंदिग्राम एक्सप्रेस जर नांदेडवरून केली तर किनवट येथून एकही रेल्वे धावू देणार नाही ; राकाँ तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांचा इशारा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 13, 2020

नंदिग्राम एक्सप्रेस जर नांदेडवरून केली तर किनवट येथून एकही रेल्वे धावू देणार नाही ; राकाँ तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांचा इशारा

 


किनवट (नांदेड) : मुंबई – नागपुर – मुंबई धावणारी नंदिग्राम एक्सप्रेस ही रेल्वेगाडी नांदेड – मुंबई अशी धावणार असेल तर किनवट येथुन एकही रेल्वेगाडी धावु देणार नाही अ असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिला आहे.


             नंदिग्राम एक्सप्रेस सह, तिरुपती जाणारी कृष्णा एक्सप्रेस, बुध्दगया जाणारी दीक्षाभुमी एक्सप्रेस, आदिलाबाद ते परळी, आदिलाबाद ते पुर्णा ह्या गाड्या देखील तात्काळ सोडण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

           किनवट , बोधडी, हिमायतनगर, भोकर, तालुक्यासह मराठवाडा विदर्भातील बहुतांश भागाला उपयुक्त असणारी नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी नांदेड येथुन सोडण्यात येणार असल्याचे एक पत्र समाज माध्यमावर प्रसारीत होत आहे. ती गाडी नागपुर ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली असून आता ही गाड़ी नांदेड ते मुंबई दरम्यान सोडण्यात येणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या हैद्राबाद येथील कार्यालयाव्दारे प्रसिध्द करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारण मराठवाडा व विदर्भातील सिमावर्ती भागातील नागरीकांना राज्याच्या विविध ठीकाणी ये-जा करण्याकरिता उपयुक्त असलेली गाडी व परिसरातील कॅन्सर रुग्ण, गंभीर स्वरुपात आजारी व्यक्तींना मुंबई व राज्याच्या विविध ठिकाणी उपचार घेण्याकरिता जाण्यासाठी एकवमेव गाडी उपलब्ध आहे. तर नांदेड – नागपुर या मार्गाचे ब्रॉडगेज झाल्या नंतर नंदिग्राम व्यतीरिक्त एकही गाडी या मार्गावर सोडण्यात आलेली नाही. तर तुरळक साप्ताहीक गाड्यावर या परिसरातील नागरीकांची परवड करण्यात आलेली आहे. आता लॉकडाऊन नंतर हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येत आहे. याकरिता गोरगरीब जनतेला प्रवास करण्याकरिता उपयुक्त अशा नंदिग्राम एक्सप्रेसला जर रेल्वे प्रशासन नांदेड येथुन सोडत असतेल तर हे खुप क्लेशदायक आहे. यामुळे नंदिग्राम एक्सप्रेस तर किमान आदिलाबाद ते मुंबई – आदिलाबाद या मार्गावर धावलीच पाहिजे अशी भुमीका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची असुन  जर ही मागणी पुर्ण झाली नाही तर हा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पर्यंत जाणार असल्याचेही तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सांगितले.

             येथील नागरीकांना आदिलाबाद, नांदेड, हैद्राबाद, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मनमाडसह राज्यातील व देशातील विविध ठिकाणी प्रवास करण्याकरिता उपयुक्त अशी जोड रेल्वे म्हणुन नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी अत्यंत महत्वाची आहे. मुंबईमध्ये जे महत्व लोकल ट्रेनचे आहे तेच महत्व नंदिग्राम एक्सप्रेसचे किनवट, माहुर, भोकर, हिमायतनगर, नांदेडच्या नागरीकांना आहे, यामुळे या गाडीची उपयुक्तता किती महत्वाची आहे हे यावरुन निदर्शनास येईल. परंतु जर रेल्वे प्रशासन ही गाडी नांदेड येथुन सोडत असेल तर मग आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही, लॉकडाउन मुळे कामधंदा बंद झालेल्या नागरीकांकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. त्यात दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता नाही. त्यात जर दळणवळन करायचे असेल तर खाजगी वाहन भाड्याने घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  काही नागरीकांचे उत्पन्न हे रोजच्या प्रवासावर देखिल अवलंबुन असते. अशा स्थितीत जिल्ह्यापासुन १५० किमी अंतर व राज्याच्या राजधानी पासुन ८५० किमी अंतरावर असलेल्या किनवट करिता तत्काळ रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी  मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वे करिता राष्ट्रवादी आंदोलन छेडणार असेल तर त्यास शहरातील व तालुक्यातील विविध संघटना, पक्ष, सामाजिक समुह, समाज माध्यमावरील समुह देखील समर्थन करणार आहेत, अशी एकुणच भुमिका परिसरात निदर्शनास येत आहे. 

             यामुळे परिसराकरिता अत्यंत महत्वाच्या रेल्वे गाडी करिता फक्त एका पक्षाने आंदोलन छेडुन चालणार नाही तर सर्व राजकीय पक्षांच्या  नेत्यांनी, पदाधिका-यांनी एकत्र येऊन आंदोलन करावे, अशी चर्चा जनसामान्यातून होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News