213 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 345 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 15, 2020

213 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 345 बाधितांची भर तर तीन जणांचा मृत्यू

 

 


नांदेड (जिमाका) दि. 15 :- मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 213 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 345 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 58 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 287 बाधित आले. 

 

आजच्या एकुण 1 हजार 485 अहवालापैकी 940 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 182 एवढी झाली असून यातील 7 हजार 909 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 889 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 51 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात मंगळवार 15 सप्टेंबर रोजी हडको नांदेड येथील 76 वर्षाच्या एक महिलेचा, कुंडलवाडी बिलोली येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णपुरी नांदेड येथे तर गवळीपुरा नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 321 झाली आहे.  

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8, किनवट कोविड केंअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 14, माहूर कोविड केंअर सेंटर 19, मुखेड कोविड केंअर सेंटर 28, खाजगी रुग्णालय 24, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 25, हदगाव कोविड केंअर सेंटर 20, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 44, कंधार कोविड केंअर सेंटर 4, मुदखेड कोविड केंअर सेंटर 3, नायगाव कोविड केंअर सेंटर 17, लातूर येथे संदर्भित केलेले 1

असे 213 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 29, अर्धापूर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 3, हिंगोली 7, नांदेड ग्रामीण 3, हिमायतनगर तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 5, परभणी 4 असे एकुण 58 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 94, हदगाव तालुक्यात 14, अर्धापूर तालुक्यात 15, किनवट तालुक्यात 11, बिलोली तालुक्यात 9, मुखेड तालुक्यात 23, धर्माबाद तालुक्यात 5, उमरी तालुक्यात 9, हिमायतनगर तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 40, कंधार तालुक्यात 35, भोकर तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 6, माहूर तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 7, हिंगोली 1, आदिलाबाद 1 असे एकुण 287 बाधित आढळले

 

जिल्ह्यात 3 हजार 889 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 298, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 836, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 24, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 142, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 101, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 188, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 66, लोहा कोविड केअर सेंटर येथे 114, हदगाव कोविड केअर सेंटर 41, भोकर कोविड केअर सेंटर 29, कंधार कोविड केअर सेंटर येथे 59, किनवट कोविड केअर सेंटर येथे 210, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 48, मुदखेड कोविड केअर सेटर 74, माहूर कोविड केअर सेंटर येथे 19, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 52, उमरी कोविड केअर सेंटर 95, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 21, खाजगी रुग्णालयात 324 बाधित, औरंगाबाद 1 व निजामाबाद 1 संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 67 हजार 10,

निगेटिव्ह स्वॅब- 51 हजार 283,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 345,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 182,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

एकूण मृत्यू संख्या- 321,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 7 हजार 909,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 889,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 592, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 51,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 67.03 टक्के 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News