किनवटमध्ये आज 11 बाधितांची भर , 2 रुग्णांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 17, 2020

किनवटमध्ये आज 11 बाधितांची भर , 2 रुग्णांचा मृत्यू

  


किनवट : किनवटमध्ये गुरुवारी ( ता.17) सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त माहितीनुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे  11 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 417  झाली आहे. आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 183 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 105 रुग्ण उपचार घेत आहेत 113 जण होम क्वारंटाईन आहेत.  

              आजच्या अहवालात किनवटच्या वेलमापूरा येथील 2, बेल्लोरी(कि) येथील 2,  सिंगारवाडी येथील 1, मांडवा येथील 2, डोंगरगाव येथील 3 व गणेशपूर येथील 1 अशा 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इस्लापूर येथील 1 व दहेली येथील 1 अशा 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

                   आज नवे रुग्ण आढळल्याने सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांनी सिंगारवाडी, डोंगरगाव व गणेशपूर या गावाला कंटेन्मेंट झोन जाहिर केले आहे. या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, संतोष केंद्रे,मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.

                 डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 34, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 71 व होम क्वारंटाईन 113 अशा एकूण 218 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

ता. 17/09/2020 सायंकाळी 06.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 629,

निगेटिव्ह स्वॅब- 530,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 0,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट -80,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या -11,

निगेटिव्ह अहवाल -69,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -11,


आज मृत्यू - 2,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 13,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -417, 

आज सुटी दिलेले- 0,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-183,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 105 (113 होम क्वारंटाईन  )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News