नवी दिल्ली : सरकारने अलिकडेच क्रीडा कोट्यातर्गत केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी 20 नवीन क्रीडा प्रकार जाहीर केले आहेत. क्रीडा कोट्यातर्गत केंद्र सरकारच्या नोक-यांसाठी नव्याने सादर झालेल्या / समाविष्ट 20 क्रीडा प्रकारांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
अनु क्र. क्रीडा प्रकारचे नाव.
1 : बेसबॉल
2 : बॉडी बिल्डिंग
3 : सायक्लिंग पोलो
4 : डेफ स्पोर्ट्स
5 : फेन्सिंग
6 : कुडो
7 : मल्लखांब
8 : मोटर स्पोर्ट्स
9 : नेट बॉल
10 : पॅरा स्पोर्ट्स (पॅरा -ऑलिम्पिक आणि पॅरा आशियायी स्पर्धांमध्ये समाविष्ट क्रीडा प्रकारांसाठी)
11 : पेनकाक सिलट
12 : शूटिंग बॉल
13 : रोल बॉल
14 : रग्बी
15 : सेपाक टकराव
16 : सॉफ्ट टेनिस
17 : तेनपिन बॉलिंग
18 : ट्रायथलॉन
19 : टग ऑफ वॉर
20 : वुशू
क्रीडा कोटा अंतर्गत गुणवंत खेळाडूंची नियुक्ती कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळोवेळी केली जाते आणि ती फक्त केंद्र सरकारच्या मंत्रालये / विभागांना लागू आहे. “क्रीडा ” हा राज्याचा विषय असल्याने या सूचना राज्य सरकारांसाठी बंधनकारक नाहीत.
दि. 01 सप्टेंबर 2020 च्या क्रीडा विभागाबरोबर केलेल्या विचारविनिमयानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत गुणवंत खेळाडूंची नेमणूक करण्यासाठी मल्लखांब, टग ऑफ वॉर आणि रोल बॉलचा समावेश नव्याने सुरू केलेल्या 20 क्रीडा प्रकारांमध्ये केला आहे.
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.




No comments:
Post a Comment