प्रणब मुखर्जी सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह’: राज्यपाल कोश्यारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 1, 2020

प्रणब मुखर्जी सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह’: राज्यपाल कोश्यारी

 


            मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

            स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ताकार्यकुशलतासंघटन कौशल्यप्रशासकीय व सांसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप सोडणाऱ्या निवडक राजकारण्यांमध्ये प्रणब मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

            गेल्या पाच दशकांमध्ये प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्रीसंरक्षण मंत्रीसभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची ऊंची वाढविली. जवळ जवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणब मुखर्जी यांनी देशातील सांसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहे. भारतमातेच्या या थोर सुपुत्राला मी आपली श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितोअसे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News