शिक्षक दिना निमित्त शिक्षणासाठी धडपडणाऱ्यांना वंदन -कैलास पिराजी पोहरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 5, 2020

शिक्षक दिना निमित्त शिक्षणासाठी धडपडणाऱ्यांना वंदन -कैलास पिराजी पोहरे

 


           "शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास होय."

राष्ट्रीय प्रतीके आणि राष्ट्र यांची कधीच पायमल्ली होणार नाही,आपल्या आचरणातून,

वाणीतून कधीही त्यांचा अवमान होणार नाही असा आदर्श नागरिक घडवने म्हणजे आदर्श शिक्षण होय.आणि ते देणारे 

शिक्षक म्हणजे खरे आदर्श शिक्षक.मग भले ही त्यांना कुठला पुरस्कार मिळो अथवा 

न मिळो ते कायम आदर्शच असतील. 

       हजारो वर्ष जो समाज या मूलभूत हक्कापासून वंचित होता.त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी या भुतलावर  एका महामानवाचा 11 एप्रिल 1827 रोजी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात जन्म झाला.

त्याचे नाव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले (गोरे )त्यांनी मनुवादी जात,

धर्म,विषमता,स्त्रिया,शूद्रातिशूद्र,

शेतकरी यांचे दास्य,बंदिस्त शिक्षण व्यवस्था या अमानुष्य अंधारावर 19 व्या शतकात नांगर धरला.अमानवी व्यवस्थेवर फुली मारली.फुल्यानी या अन्यायी व्यवस्था  केवळ नकाराची फुलीच मारली नाही तर समता,न्याय,बंधुता या मूल्यांवर आधारित नवा पर्याय उभा केला.जाती धर्माच्या प्रदूषित पर्यावरणात ज्योतिबांच्या आणि ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची दखल आजपर्यंत घेतली गेली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.खरेतर त्यांना आजपर्यंत *भारतरत्न* मिळायला हवा होता.त्या नंतर निस्वार्थी पणे गोरगरीब लोकांच्या शिक्षणा साठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले ते कर्मवीर भाऊराव पाटील.महर्षी धोंडो केशव कर्वे,यांना पण श्रेय द्यावे लागेल.  

महात्मा ज्योतिबा फुले म्हणत,

"विद्या विना मतीगेली, 

मती विना गती गेली, 

गतीविना शूद्र खचले 

इतके अनर्थ एका 

अविद्येने केले... "

         आणि नुसते म्हटलेच नाही तर त्यावर जालीम औषध लस काढली ते म्हणजे वाडी, पाडा,गोरगरीब यांच्या साठी शिक्षण देण्याची व्यवस्था केली. म्हणजेच सर्व समावेशीत शाळा सुरुवात केल्या.त्या काळात ते एक बांधकाम व्यावसायिक आणि प्रसिद्ध आणि सधन शेतकरी होते.पुण्यात टोलेजंग वाडा होता.पण त्यांनी आपले सर्वस्व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी वाहिले.. 

       कारण त्याच्यावर टॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता.आणि 1848 लाच एका उच्चवर्णीय मित्राच्या वरातीत त्यांचा अपमान झाला.आणि तेथून त्यांच्या मनात ठाम झाला. या देश्याच्या वर्णव्यवस्थेवर घाला घातला पाहिजे. म्हणून  त्याच वर्षी पुण्यात भिडेचा वाडा येथे पहिली मुलींची शाळा काढली.त्यांना शिक्षण देण्यासाठी स्वतःची पत्नी आणि फातेमा बीबी यांची नेमणूक

केली.त्याच शाळेतील विध्यार्थीनी मुक्ता साळवे हिने समस्त मानव जातीस विचार करावयास लावणारा *आमचा धर्म कोणता* हा निबंध लिहिला होता.महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन ला त्या काळात काहीच सूचना केल्या होत्या.... 

           भारताचे माजी राष्ट्रपती *डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन* यांचा जन्म दिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.त्यांचा जन्म

05/09/1888 

रोजी तिरुतानी येथे झाला.ते 1918 ला म्हैसूर विद्यापीठात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख होते.1921 कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक झाले.1926 इंग्लंड येथील जागतिक तत्वज्ञान परिषदेला कलकत्ता विद्यापिठाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.तेथे त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व वेगवेगळ्या पद्धतीने जगाला समजावून सांगितले.1931-1936 आंध्रप्रदेशच्या विद्यापिठाचे कुलगुरू राहिले.1936 ला इंग्लंड च्या ऑक्सफर्ड विद्यापिठात प्राध्यापक.1939-1948 बनारस हिंदू विद्यापिठात उपकुलगुरू म्हणून काम केले.1948 युनोस्कोच्या कार्यकारी मंडळावर निवड. 

1948 पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष.1949-1952  रशियात भारताचे राजदूत.1952-1962 भारताचे उपराष्ट्रपती.1962 -1967 भारताचे सर्वोच्च प्रमुख म्हणजे राष्ट्रपती झाले.24 एप्रिल 1975 ला त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या इच्छेप्रमाणे दरवर्षी त्याचा जन्म दिन *शिक्षक दिन* म्हणून साजरा करण्यात येतो.आणि वर्ष भरात केलेल्या कार्याची दखल म्हणून राष्ट्रीय,राज्य,जिल्हा आणि तालुका स्तर येथून शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. 

                   असेच आम्ही लहानपणापासून कितीतरी शिक्षक दिन साजरे केलेले आहेत.प्रत्येक वेळी कोणत्यातरी शिक्षकाविषयी आपले मत प्रगट केले.माणूस हा आजन्म विध्यार्थी असतो.सर्वांनाच आपल्या आदरणीय गुरुजी विषयी आदर असतो तसा मलाही आहे.माझे पूर्ण शिक्षण पिंपळगाव म.ता.अर्धापूर येथील जि.प.हायस्कूल मध्ये झाले. 

हे सर्वप्रथम मी माझे भाग्य समजतो.माध्यमिक ला परवानगी नसताना ही त्या वेळी प्राथमिक चे शिक्षक माध्यमिक ला शिकवत होते. त्या शाळेत 

प्रशासन आणि अध्यापन खरोखरच कौतुक करण्यासारखे होत असे.त्या वेळेस आमचे नादर साहेब श्री फुलारी सर शाळेस भेट द्यायला आले की,संपूर्ण वर्गांची,शिक्षकांची 

विचारपूस करायचे.मुलांना कोणते शिक्षक शिकवतात आणि कोणते शिक्षक शिकवत नाहीत ते विचारायचे.भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली सर्व मुलांना बसावयास लावून त्यांच्या कडून गाणी म्हणून घ्यायचे.त्यांचे सर्वात आवडते गाणे *खरा तो एकची धर्म* हे गीत ते समोर म्हनायचे आणि आम्ही सर्व मुले पाठीमागे.म्हणत होतो हे चित्र आणि स्वप्न मला आजही पडतात..... बल सागर भारत होवो हे गीत ते खूपच पहाडी आवाजात म्हणायचे. 

          पहिलीचे लाटकर सर आणि त्यांनी खुल्या काडेपेटी पासून बनवलेले घर आजही दिसते.धोती वाले बिर्हाडे सर,खुर्चीवर बसून छडी फेकून मारणाऱ्या कुलकर्णी मॅडम,

शोभा देशमुख मॅडम,मनोहरे मॅडम,आठवले सर हातावर रुल फुटेपर्यंत मारायचे,कविता अगदी तालासुरात आणि तल्लीन होऊन शिकवनाऱ्या देशमुख मॅडम,फाटे मॅडम,

बॉसकर मॅडम,विज्ञान शिकवणाऱ्या साधना मॅडम,

इंग्रजी चे कदम सर, हिंदी चे गौड सर,आश्रम शाळेचे श्री परदेशीं सर जे मला नेहमी जावई म्हणायचे,माझे मामा प्राथमिक असूनही उत्कृष्ट दर्जाचे माध्यमिक ला मराठी शिकवायचे.राठोड सर इतिहास, 

पवार सर हिंदी,बनसोडे सर गणित,असे कितीतरी शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक ला शिकवायला होते.या सर्वांचे मी आभार मानतो कारण यांच्यामुळे मी माणूस झालो.त्याच शाळेतील वर्ग दोन चे मुख्याध्यापक श्री दूधमल सर यांनी मागील आठवड्यात एका फोनवर मला माझे निर्गम उतारा दिला.ते पण या शाळेसाठी एका रत्नापेक्षा कमी नाहीत. 

            नंतर कॉलेज मध्ये सुद्धा एकापेक्षा एक सरस गुरुजन वर्ग लाभला.त्यातल्या त्यात मराठी विषयावर ज्यांचे खूपच प्रभुत्व आहे असे श्री जगदीश कदम सर  साहित्यिक,मथु सावंत (पाण्यातील पायवाट कथासंग्रह) आणि गिरगावकर मॅडम.एम.झेड.सिद्धीक्की सर इंग्रजी,चव्हाण सर अर्थशास्त्र,

तसेच सिनियर ला असलेले पण आमच्या विनंतीला मान देऊन अध्यापन करणारे अर्थशास्त्र चे पंडित बिर्हाडे सर,सावंत सर समाजशास्त्र,आणि सर्वात 

महत्वाचे म्हणजे प्राचार्य ढेंगळे सर आणि उपप्राचार्य श्री बदने सर कायमचे लक्ष्यात राहतील. ही सर्व मंडळी आम्हाला ज्ञान दान करताना झीजली.म्हणून मी  त्यांचा कायमचा ऋणी राहीन. 

          या सर्वांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन 25/11/199 ते 31/05/2008 या काळात गोरठा केंद्रात कळगाव तांडा येथे तन मन धन लावून अध्यापन केले.त्याचीच फलश्रुती म्हणजे cbse च्या आंध्र बोर्डात 

माझा विध्यार्थी मुकुंद चव्हाण ची मुलगी 100 % स्कोर 

घेऊन उत्तीर्ण झाली.आणि त्याने ही बातमी पहिल्यांदा मला सांगितली.ही बातमी म्हणजे माझ्यासाठी राज्य पुरस्कार म्हणायला हरकत नाही.

01/06/2008 ते 31/05/2016 या काळात विनंती ने किनवट तालुक्यातील जंगलात असलेल्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या भूलजा येथे  प्रामाणिक कार्य केले. माझ्या कार्याची दखल पंचायत समिती किनवट ने घेतली आणि 2012 चा तालुका स्तरीय *आदर्श शिक्षक* पुरस्कार मिळाला.पण कधी कधी द्विशिक्षक शाळेचा वैताग यायचा.. म्हणून ठरवले आत्ता मोठ्या शाळेत काम करायचे... 01/06/2016 ते 31/05/2018 या काळात नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी पहिली ते सातवी पर्यंत ची शाळा असलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर माझ्या जीवनात निर्णायक वळण देऊन गेली. 

त्या ठिकाणी जे अनुभव मिळाले ते खूप कमी लोकांच्या नशिबी येतात.त्या शाळेची पटसंख्या 2016-17 ला 1700 च्या वर होती.आणि शिक्षक संख्या 40 च्या वर.परिपाठ म्हणजे खूप आदर्श उपक्रम राबवन्याचे ठिकाण बनले.आणि त्या ठिकाणी जे काम केले कौशल्य दाखवले त्याची दखल लवकरच शालेय व्यवस्थापण समितीने घेतली. आणि 2016 ला 06/09/2016 ला झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात मला शा.व्य.समितीचा *आदर्श शिक्षक* पुरस्कार मिळाला.हा पुरस्कार म्हणजे माझ्या साठी *राष्ट्रीय पुरस्कार* पेक्षा मोठा आहे.तेथील मुख्याध्यापक श्री राजकुमार बाष्टेवाड सर आणि केंद्रप्रमुख श्री सुरेश मुपडे सर माझ्यासाठी खूप आदर्श ठरले. मुपडे सर यांनी माझ्यावर तालुका स्तर *सुलभक* म्हणून जी जबाबदारी टाकली तिला मी लीलया पेलली आणि त्यांचा विश्वास सार्थ केला.प्रशिक्षण चालू असताना माध्यमिक चे शिक्षण अधिकारी साहेब भेटीस आले असता प्रशिक्षण वर्ग बघून खुश झाले आणि त्यांनी उत्कृष्ट सुलभक म्हणून जी स्तुती केली तो खरा पुरस्कार.तसेच तिथे श्री मुंढे सर,पंकज कासार काटकर साहित्यिक,श्री देशमुख सर,जाधव सर आणि साहित्यिक श्रीकांत गोरशेटवार सर,साहित्यिक श्री गणपत गायकवाड सर यांचा दुर्मिळ आणि महत्वपूर्ण सहवास मिळाला. 

         29/05/2018 ते आज पर्यंत केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे आलो.आणि आपली कुठलीही लायकी नसताना जवळपास दीड वर्षे केंद्रीय शाळा चालवन्याची संधी मिळाली.मी धन्य झालो.. आत्ता पुन्हा वाटते एखादी द्विशिक्षक असलेली शाळा बघून बदली करून घ्यावी. 

       *माझ्या जीवनास चंद्राच्या कले प्रमाणे आकार देणाऱ्या समस्त गुरुजनाना वंदन करतो. आणि माझे मित्र व वाचक यांना  शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा देतो.*

शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येस एक गोड बातमी कळली जि.प.हाय स्कूल पिंपळगाव म.ता.अर्धापूर येथील शिक्षक आणि आमचे मित्र श्री केशव दादजवार सर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला हे वाचून पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 

जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव म.हे नाव जेव्हा जेव्हा ऐकण्यात येते तेव्हा तेव्हा मनात एक उभारी येते आणि अभिमान वाटतो.की या शाळेत 1984 ते 1993 ही आयुश्यातील अतिमहत्वाचे जीवन घालवले.कितीतरी शिक्षक,मित्र आजही डोळ्यासमोर उभे राहतात मग प्रश्न पडतो यालाच प्राथमिक आणि स्वातंत्र्य जीवन म्हणतात.या शाळेचा आणि तिथे कार्यरत शिक्षकांचा मला अभिमान आहे.

केवळ विद्यार्थ्यांसाठी असलेली शैक्षणिक तळमळ आणि समाजाप्रती आपलं काहीतरी असलेलं देणं या आपल्या सद्विचारानेच आपल्या हातून आतापर्यंत उत्कृष्ट असे शैक्षणिक व सामाजिक कार्य घडत आहे.

          आपल्या या अद्वितीय व अनमोल कार्यामुळेच आपली जिल्हा पुरस्कारासाठी झालेली निवड ही नक्कीच सर्व शिक्षकांना प्रेरणा देणारी आहे.हे सुद्धा खरं आहे की पात्र व्यक्तींना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला तरच सर्व शिक्षकांना आनंद आणि अभिमान वाटतो आणि निश्चितच आज आम्हा सर्व शिक्षकांना आपला अभिमान वाटतो.

         असेच उत्तमोत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहो हीच सदिच्छा...!

आपले खूप खूप अभिनंदन दादजवार सर....!

तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹

 -कैलास पिराजी पोहरे,

 प्राथमिक शिक्षक, 

 कें.प्रा.शाळा निळा 

 ता. जि.नांदेड 

9763362192/8766858531

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News