नांदेड (जिमाका) दि. 12 :- गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 27 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 290 अहवालापैकी 1 हजार 261 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 567 एवढी झाली असून यातील 18 हजार 589 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 266 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुखेड तालुक्यातील धामगाव येथील 60 वय वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 535 झाली आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, भोकर तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 6, बारड अंतर्गत गृहविलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1,मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, कंधार तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 1 असे एकूण 42 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, देगलूर तालुक्यात 1, मुखेड 1, कंधार 1 असे एकुण 5 बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 15, लोहा तालुक्यात 1, मुखेड 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 2, अकोला 1 एकूण 22 बाधित आढळले.
जिल्ह्यात 266 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 38, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 36, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 77, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 13, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8,
धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 28 आहेत.
गुरुवार 12 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 165, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 76 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 25 हजार 502
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 2 हजार 500
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 567
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 589
एकूण मृत्यू संख्या- 535
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 353
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 266
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 17.
फटाक्याच्या धुरामुळे कोविड बाधित रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment