किनवट : तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहपूर येथे गुरुवारी (ता.६) 'पीसीएफ' संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास पीसीएफ संस्थेचे प्रतिनिधी सिद्धार्थ झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोहपूर गावच्या सरपंच सुवर्णाताई देविदास आमले, पोलीस पाटील प्रदीप सोनटक्के, तंटामुक्ती अध्यक्ष भगवानराव चिरंजी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा तांबारे आणि शाळेचे मुख्याध्यापक सचिन नरवाडे हे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सिद्धार्थ झोडगे यांनी पीसीएफ संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची सविस्तर माहिती दिली. शालेय किटचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील महत्त्व सांगतानाच शैक्षणिक उठावामध्ये संस्था कशा प्रकारे योगदान देत आहे, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र चौधरी, संघरत्न घुले, अमोल सुंकलवाड, गजानन राठोड, सागर आमले, हापसे, शारदा तांबारे तसेच आकाश वानोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:
Post a Comment