अण्णाभाऊंच्या साहित्यातून सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचा "क्रांतिकारी वारसा" निर्माण होतो -आमदार भीमराव केराम #किनवट येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 1, 2026

अण्णाभाऊंच्या साहित्यातून सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचा "क्रांतिकारी वारसा" निर्माण होतो -आमदार भीमराव केराम #किनवट येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी



किनवट (रविराज कानिंदे ) : "भारतात ज्या महापुरुषांनी जन्म घेतला, त्यांना भावी पिढीपुढे आदर्श म्हणून ठेवण्यासाठी त्यांची स्मारके व पुतळे उभारणे अत्यंत गरजेचे आहे. अण्णाभाऊंनी शोषित, उपेक्षित वंचित घटकांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर त्याग केला. अशा महापुरुषांची वैचारिक विभागणी  म्हणजे मानवतावादी विचारसरणीची विभागणी  करण्यासारखे आहे, असे मौलिक प्रतिपादन किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी केले.

     ​ साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या  जयंती सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

​अध्यक्षस्थानी  नगराध्यक्ष सुजाता विनोद एंड्रलवार  होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष के. मूर्ती , उपनगराध्यक्ष हसनलाला , मातंग समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवना कलगुटवार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, युवा कार्यकर्ते  करण एंड्रलवार यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

     ​पुढे आ  केराम म्हणाले की , अण्णाभाऊ साठे हे विद्रोही कवी, लेखक आणि कलावंत होते. समाजातील भीषण वास्तवावर त्यांनी अथांग साहित्यनिर्मिती करून समता प्रस्थापित केली त्यांच्या याच अतुलनीय योगदानामुळे राज्य सरकारने त्यांचा जयंती दिन 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून घोषित केला आहे; हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि विचारांचा सर्वात मोठा सन्मान आहे."

​यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे  गाळा व भव्य वाचनालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उपवर्गीकरणावर त्यांनी भाष्य केले.आरक्षणाचा वाटा कोणाला किती मिळावा, या प्रश्नावरून उपेक्षित असणारा व सर्वात मोठा समजला जाणारा समुदाय एकमेकांसमोर उभा ठाकणे संयुक्तिक नाही. हा प्रश्न सामंजस्याने व दोन्ही घटकांच्या समन्वयाने सोडवला पाहिजे.


      यावेळी प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी अण्णाभाऊंच्या सांस्कृतिक व वैचारिक परिवर्तनवादी साहित्यनिर्मितीची सविस्तर माहिती दिली. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" या ओळींतून अण्णाभाऊंचा आदर्श आणि त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या लेखणीतील प्रत्येक शब्दात  मानवतेचाच संदेशआहे. नगराध्यक्ष सुजाता विनोद एंड्रलवार व माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.

      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन अण्णाभाऊ साठे पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अन्नदान असे विविध उपक्रम आयोजित केले होते.

      मारोती सुंकलवाड यांनी प्रास्ताविक व   उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले . लक्ष्मीपती दोनपेलीवार यांनी आभार मानले. 

याप्रसंगी रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष  दादाराव कयापाक, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील , आनंद मच्छेवार, साजिद खान, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार, भाजपाचे सुधाकर भोयर ,पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे ,  नपचे स्वीकृतसदस्य प्रशांत कोरडे, नगरसेवक सुरज सातूरवार, संतोष मरासकोल्हे, राम नेम्णीमावार माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरसेविका ललिता मुनेश्वर, अश्विनी जार्गलावार , माजी नगरसेविका अनुसया अन्नेलवार, निसार भाटी , इमरान शेख , प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, ऍड. हरी दर्शनवाड , ऍड. मिलिंद सर्पे, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार , प्राचार्य डॉ. सागर शिल्लेवार बसपाचे भीमराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती .

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण दोनकलवार, रवि उप्पलवार,राकेश उपलवार, राहुल गडचंदावार, अक्षय अंनेलवार, साई कारलावार, संतोष मारपवार, राजू धुमटवार, विकास बोलेनवार, विकास गोटीमुकावार, अंकुश मंत्रीवार, मनोज मंत्रीवार, दत्तू कर्दपवार, नरेश माहूरकर, प्रदीप दोनकोंडावार, शिवम कर्दपपवार, बबन मारपवार, गंगाधर नूतनेपेल्लीवार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला किनवट तालुक्यातील समाज बांधव , पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     याप्रसंगी रमाई गायन पार्टीचे दिलीप गंगाराम मुनेश्वर, मधुकर उमरे, विवेक ओंकार , बालाजी वाढवे , संजय ठोके, गणेश शेवाळे , प्रकाश येरेकार , गणपत वासाटे व तबला मास्टर दवणे यांनी अण्णाभाऊंच्या जीवन कार्यावर बहारदार गिते सादर केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News