किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील सह शिक्षिका संगीता सदशिव भवरे (वय 51 वर्षे) यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना गुरुवारी ( ता. 9 जुलै 2026 ) निधन झाले .
राजर्षी शाहू नगर , गोकुंदा येथील त्यांच्या निवास स्थानापासून शुक्रवारी (ता. 10 जुलै 2026 ) दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून गोकुंदा येथील एरिगेशन कॉलनी जवळील पैनगंगा तिरावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणारा विरेन व अभियांत्रिकी प्रथम वर्षीचे शिक्षण घेणारा आयुष ही दोन मुलगे असून नागसेन पाटील ढाणकीकर यांच्या त्या पत्नी होत.




No comments:
Post a Comment