नांदेड : नांदेड तालुक्यातील मौजे सायाळ येथील ज्येष्ठ नागरिक गिरजाबाई निवृत्ती गच्चे यांचे शनिवार (दि.२३ ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील प्रा. डॉ. राजेश गच्चे यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत गिरजाबाई निवृत्ती गच्चे यांच्या पार्थिवावर रविवार ( दिनांक २४ जानेवारी ) रोजी सकाळी ९ वाजता सायाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत गिरजाबाई गच्चे यांच्या मागे पाच मुले, दोन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.




No comments:
Post a Comment