शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम संघटनानी राज्यभर आयोजिलेल्या 'शाईन बागच्या ' धर्तीवरील "किसान बाग " आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
मुंबई, दि. २४ : केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले. ते बिल मागे घेण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना दाद द्यायला तयार नाही. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक मुस्लिम संघटना येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे या आंदोलनाचे स्वरूप असेल.
केंद्रात सत्तेवर आलेले भाजपा सरकार मनमानी कारभार करीत असून देश विरोधी कायदे तयार करीत आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. सीएए व एनआरसी हे त्यापैकीच तयार करण्यात आलेले कायदे आहेत. याला देशातील अनेक नागरिकांनी विरोध केलाय. आता केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी कायदे केले असून नुकतेच तीन कृषी विधेयक बिल पास केले आहे. त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य शेतकरी मात्र या कायद्यामुळे अडचणीत आला आहे. कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे म्हणून गेले दोन महिने शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार हे बिल मागे घेण्यास तयार नाही. यापूर्वी शाईन बाग आंदोलनात सर्व धर्मियांनी सहभाग घेऊन मोठे आंदोलन केले होते. आजही कृषी विधेयक बिला विरोधात आंदोलन चालू असून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शाईन बागच्या धर्तीवर किसान भाग आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांच्या पुढाकारातुन "किसान बाग" आंदोलनाचे आयोजन
मुंबई : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातुन सर्व जिल्ह्यात "किसान बाग" आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
वादग्रस्त नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सिमेंवर शेतकरी आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय 'किसान बाग' आंदोलन करण्याची घोषणा सदर मेळाव्यात करण्यात आली.
या मेळाव्याला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचींग सारखे अत्याचार केले, हजारो दलितांचा शोषन सुरु आहे परंतु वर्तमान व्यवस्थेने लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. याला आम्ही शासन पुरुस्कृत हत्या समजतो. या वरुन देशात शेतकरी हा सर्वात अत्याचार पिडीत आहे व सर्व पिडित-शोषीत घटकांनी एकत्रीत येऊन शेतक-यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे, ते पुढे म्हणाले की सिएए एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्ता व अधिकारांचे दुरुपयोग करत दिल्लीतील शाहीन बाग चळवळीला चिरडण्याच प्रयत्न करत होते त्यावेळी पंजाबच्या निरनिराळ्या भागातील शेतकऱ्यांनी शाहीन बागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखवले होते आणि आत्ता पंजाबमधील शेतकर्यांशी एकरुपता व सहानुभूती दाखवत मुस्लिमसमाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरू करण्याचे घेतलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे. अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये असे आरएसएसचे षडयंत्र आहे म्हणुन मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरएसएससारख्या संघटनेला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्व उत्पीडित लोकांमध्ये ऐक्य असणे आवश्यक आहे असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ताई ठाकूर, राज्य प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे दिशा पिंकी शेख, वाशिम मंगरुलपीरचे नगराध्यक्षा डॅा गजाला खान, मुंबई किसान बाग तहरीर संयोजक अब्दुल बारी खान तसेच वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा व विधानसभा उमेदवार, जळगाव, अकोला, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड, नाशिक, नांदेड, पुणे, वाशिम, अमरावती, परभणी, बुलढाणा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, पालघर, नवी मुंबई, बेलापूर, मीरा-भाईंदर, ठाणे, मुंब्रा व मुंबईतील गोवंडी, सायन, कांदिवली, धारावी, भायखळा, कुर्ला, वरळी व घाटकोपर मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व शेकडो मुस्लिम कार्यकर्ते व
नेते उपस्थित होते.
मुस्लिम समाजाच्या 'किसानबाग' आंदोलनामुळे जातीवादी राजकारणाला शह मिळेल -ऍड. प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातुन दिनांक २७ जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात "किसान बाग" आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये असे आरएसएसचे षडयंत्र आहे म्हणुन मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मुस्लिम समाजाच्या 'किसानबाग' आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केले.
या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर भवन, मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीत राज्यव्यापी किसान बाग आंदोलन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वादग्रस्त नवीन कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सिमेंवर शेतकरी आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय 'किसान बाग' आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
पुढे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्मांध जातीयवादी शक्तींनी देशातील शेकडो मुसलमानांचा छळ करत माॅबलिंचींग सारखे अत्याचार केले, हजारो दलितांचा शोषन सुरु आहे परंतु वर्तमान व्यवस्थेने देशातील लाखो शेतकऱ्यांचा इतका छळ केला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. याला आम्ही शासन पुरुस्कृत हत्या समजतो. या वरुन देशात शेतकरी हा सर्वात अत्याचार पिडीत आहे व सर्व पिडित-शोषीत घटकांनी एकत्रीत येऊन शेतक-यांच्या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे, ते पुढे म्हणाले की सिएए एनआरसी विरोधी आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारने सत्ता व अधिकारांचे दुरुपयोग करत दिल्लीतील शाहीन बाग चळवळीला चिरडण्याच प्रयत्न करत होते त्यावेळी पंजाबच्या निरनिराळ्या भागातील शेतकऱ्यांनी शाहीन बागेत येऊन लंगर व आंदोलकांच्या समर्थनाचे औदार्य दाखवले होते आणि आत्ता पंजाबमधील शेतकर्यांशी एकरुपता व सहानुभूती दाखवत मुस्लिमसमाजाने आपापल्या शहरांमध्ये किसान बाग आंदोलन सुरू करण्याचे घेतलेले निर्णय हे अभिनंदनीय आहे. या देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरएसएससारख्या संघटनेला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्व उत्पीडित लोकांमध्ये ऐक्य असणे आवश्यक आहे असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा किसान बाग आंदोलनाचे राज्य समन्वयक फारुख अहमद, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ता अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन, शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अब्दुल समद अब्दुल नसिरुद्दीन, जिल्हा उपाध्यक्ष खालिद पटेल, शहर उपाध्यक्ष हाजी अहमद कादरी, महासचिव इरफान इलाही खान, महासचिव अफसर पठाण, मुख्य संघटक आसिफ अब्रार, सय्यद मुख्तार, बाबा पटेल, सुभान शहा, शेख रईस, आदी पदाधिकारी उपस्थित होते.






No comments:
Post a Comment