आता नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 2 व 3 फेब्रुवारीस ; किनवट तालुक्याचे आरक्षण 2 रोजी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 27, 2021

आता नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 2 व 3 फेब्रुवारीस ; किनवट तालुक्याचे आरक्षण 2 रोजी

 



नांदेड : मा.उच्च न्यायायल, खडपीठ , औरंगाबाद याचेकडे दाखल रिट याचिका क्र.969 / 2021 नुसार सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात दावा दाखल आहे . त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाचा पूर्वीचा दिनांक 28 व  29 जानेवारी , 2021 मध्ये बदल करणे इष्ट असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर ( भा.प्र.से. ) , यांनी दिनांक 20 जानेवारी , 2021 च्या आदेशामध्ये अंशतः बदल करून नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी सोडतीचा दिनांक 2 व 3 फेब्रुवारी जाहीर केला आहे.


          जिल्हाधिकारी कार्यालयाने दिनांक 20 जानेवारी , 2021 च्या एका आदेशान्वये  मुबई याम पंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 चे नियम 2013 ( 2 ) अन्वये शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील ग्राम पंचायत सरपंच पदाचे राज्य स्तरावरील आरक्षण वाटप परिशिष्ट पा क ग्रापंनि -2020 /4.0.06 / परा -2 दि .05 मार्च 2020 अन्वये जिल्हयासाठी सरपंच पदाचे आरक्षण विनिर्दिष्ट केल्यानुसार सन 2020-2025 मध्ये होणा - या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेवून बिगर अनुसूचित क्षेत्रात येणा-या व अनुसूचित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचा एकाच वेळी विचार करून , पुढील ( 5 ) वर्षासाठीचे आरक्षण हे दिनांक 28 व 29 जानेवारी , 2021 रोजी निश्चीत करण्यात  आले होते. परंतु मा.उच्च न्यायायल,खडपीठ , औरंगाबाद यांचेकडे दाखल रिट याचिका क्र.969 / 2021 नुसार सरपंच पदाच्या आरक्षणासंदर्भात दावा दाखल आहे . त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणाचा  दिनांक 28 व 29 जानेवारी , 2021 रोजीच्या दिनांकात बदल करणे इष्ट आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर ( भा.प्र.से. ),  दिनांक 20 जानेवारी , 2021 च्या आदेशामध्ये अंशतः बदल करून नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी सोडतीचा दिनांक व वेळ खालील प्रमाणे निश्चीत करून दिली आहे. 

सरपंच पदाचे आरक्षण व महिला आरक्षण काढणे 

अ.क्र. : प्राधिकृत अधिकारी, तालुका  : बैठकीचा दिनांक व वेळ :  

1 : नांदेड तहसिलदार ,  नांदेड : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

2 : अर्धापूर तहसिलदार , अर्घापुर : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

3 : भोकर तहसिलदार , भोकर : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

4 : मुदखेड तहसिलदार , मुदखेड : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

5 : हदगाव तहसिलदार , हदगांव : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

6 : हिमायतनगर तहसिलदार , हिमायतनगर : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा .

7 : किनवट तहसिलदार , किनवट : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा. 

8 : माहूर तहसिलदार , माहुर : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

9 : धर्माबाद तहसिलदार , धर्माबाद : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

10 : उमरी तहसिलदार , उमरी : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

11 : बिलोली तहसिलदार , बिलोली : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

12 : नायगाव (खै ) तहसिलदार , नायगाव (खै ) : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

13 : देगलूर तहसिलदार , देगलुर : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

14 : मुखेड तहसिलदार , मुखेड : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 

15 : कंधार तहसिलदार , कंधार : 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11.00 वा . 

16 : लोहा तहसिलदार , लोहा : 03 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा . 


वर नमूद केलेल्या तालुका मुख्यालयाचे ठिकाणी उक्त नमुद दिनांकास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण संबधित तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येणार आहेत. सरपंचाचे आरक्षण काढणे बाबतचे कार्यक्रमास  निवडून आलेल्या सदस्यांनी उपस्थित राहावे.  मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील 2 ( अ ) व त्यातील सर्व तरतुदींचे अत्यंत काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करावे . तसेच या कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश दिनांक 20 जानेवारी , 2021 नुसार संबधीत तहसिलदार यांना प्रधिकृत केले प्रमाणे कार्यवाही अनुसरावी . आरक्षणाची नोंद कार्यालयीन अभिलेखात कायमस्वरुपी केली जाईल याची स्वतः दक्षता घ्यावी आणि कार्यवृत्तांताची एक प्रत या कार्यालयास दि . 02 / 03.फेब्रुवारी , 2021 रोजी नायब तहसिलदार ( निवडणूक ) यांचे मार्फत सादर करावी , असे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर ( भा.प्र.से. ) यांनी जाहीर केले आहे.

किनवट तालुक्यातील ग्राम पंचायती करिता  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण याप्रमाणे सरपंच पदाची आरक्षण सोडत सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार (भाप्रसे ) यांचे नियंत्रणाखाली प्राधिकृत अधिकारी तहसिलदार उत्तम कागणे  हे तहसिल कार्यालय, किनवट येथे दिनांक 02 फेब्रुवारी , 2021 रोजी सकाळी 11-00 वा. काढणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News