*दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, January 29, 2021

*दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन*

 


नांदेड (जिमाका) दि. 29 :- दुचाकी चालवितांना स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. दुचाकी स्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट सेल्फी पॉईंटची संकल्पना राबविण्यात येत आहे. यासेल्फी पाँईटचे उद्घाटन  प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.  

 

रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी  “32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021" हे 18 जानेवारी  ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्ह्यातील राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याप्रसंगी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले व राहूल जाधव, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, कार्यालयातील कर्मचारी तसेच फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संतोष तेलंग हे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News