मुंबई (सुषेण नरे) : शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सानेगुरुजीचे शिकवण देणारी श्यामची आई आज ही अजरामर आहे. शाळेतील शिक्षिका या श्यामच्या आईप्रमाणेच विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणेच शिक्षण देत आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय आहे. असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केेेले .
शिक्षण क्षैत्रात कार्य करत असलेल्या महिला शिष्टमंडळानी आज शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व साने गुरूजींच्या विचारांची अमुल्य भेट पुस्तक रुपाने दिली. याप्रसंगी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षिका श्रीमती उमा ढेरे, वरिष्ठ शिक्षिका मिनाक्षी रेडकर उपस्थीत होत्या.





No comments:
Post a Comment