*नांदेड जिल्ह्यात 60 व्यक्ती कोरोना बाधित* ▪️1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 241 निगेटिव्ह - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 21, 2021

*नांदेड जिल्ह्यात 60 व्यक्ती कोरोना बाधित* ▪️1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 241 निगेटिव्ह

 



नांदेड (जिमाका) दि. 21 :- रविवार 21 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 60 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 306 अहवालापैकी 1 हजार 241 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 149 एवढी झाली असून यातील 22 हजार 4 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, किनवट कोविड रुग्णालय 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, लोहा तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 23, धर्माबाद तालुक्यात 1, किनवट 8, मुदखेड 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1, माहूर 1, हिंगोली 1, आदिलाबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, हिमायतनगर तालुक्यात 1, देगलूर 1, किनवट 5, हदगाव 3, उमरी 1 असे एकूण 21 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 342 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 38, किनवट कोविड रुग्णालयात 6, हदगाव कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 174, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 45, खाजगी रुग्णालय 39 आहेत.   

रविवार 21 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 66 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 22 हजार 647

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 95 हजार 63

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 149

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 4

एकुण मृत्यू संख्या-592                             

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-342

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.                      

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News